• Sitemap
  • Advance Search
Economy

इंडियाहँडमेड: भारताच्या हस्तकला वारशासाठी एक डिजिटल व्यासपीठ

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2026 14:22 PM

इंडियाहँडमेड हे भारतातील हातमाग आणि हस्तकला परंपरांना ऑनलाइन अर्थव्यवस्थेशी जोडणारे एक समर्पित डिजिटल व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ कारागीर आणि विणकरांना थेट खरेदीदारांशी जोडते, त्यामुळे बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढते तसेच उपजीविका आणि सांस्कृतिक वारशाचे जतन ही होते. या व्यासपीठावर जीआय-टॅग्ड (GI-tagged) आणि ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ओडीओपी) वस्तूंसह विविध हस्तनिर्मित उत्पादने प्रदर्शित केली जातात, त्यामुळे प्रादेशिक हस्तकलांना अधिक प्रसिद्धी मिळते.

 

हस्तनिर्मित उपजीविकेसाठी डिजिटल इंडिया सेतू 

भारत हा जगातील सर्वात समृद्ध हातमाग आणि हस्तकला परंपरांचा देश मानला जातो. हे क्षेत्र केवळ भारताचा सांस्कृतिक वारसाच दर्शवत नाही, तर सर्वसमावेशक उपजीविकेचा एक महत्त्वाचा स्रोत देखील आहे.

भारतात सध्या सुमारे 64.66 लाख हातमाग आणि हस्तकला कारागीर आहेत. या मनुष्यबळात महिलांचा मोठा वाटा आहे, ऑगस्ट 2025 पर्यंत हातमाग विणकरांपैकी 71% आणि एकूण कारागिरांपैकी 64% महिला आहेत. हा भक्कम सहभाग, विशेषतः ग्रामीण समुदायांमध्ये, रोजगार आणि सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यामधील या क्षेत्राची भूमिका अधोरेखित करतो.

मोठ्या संख्येने कारागीर आणि विणकर कार्यरत असल्यामुळे हे क्षेत्र भारताच्या विकसित होत असलेल्या बाजारपेठेत आजही महत्त्वाचे स्थान राखून आहे. व्यापार अधिकाधिक डिजिटल होत असताना, ऑनलाइन माध्यमांमुळे या पारंपरिक हस्तकला समुदायांना बाजारपेठेत थेट सहभागी होण्याची संधी मिळत आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक उपजीविकांना डिजिटल वाणिज्याच्या अधिकाधिक नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

2023 मध्ये सुरू झालेले इंडियाहँडमेड, या संकल्पनेला एका समर्पित डिजिटल बाजारपेठेत रूपांतरित करते. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनद्वारे विकसित केलेले हे व्यासपीठ हस्तनिर्मित उत्पादनांना अधिक प्रसिद्धी मिळवून देते आणि विक्रेत्यांसाठी बाजारपेठेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देते.

इंडियाहँडमेड प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये

इंडियाहँडमेड, विक्रेते, खरेदीदार आणि हस्तकला वारशाला पाठिंबा देण्यासाठी तयार केलेल्या वैशिष्ट्यांच्या संचाद्वारे परंपरांना ऑनलाइन बाजारपेठेत आणते:

  • विशेष ऑनलाइन बाजारपेठ: हे विणकर आणि कारागिरांना त्यांची हातमाग आणि हस्तकला उत्पादने ऑनलाइन विकण्याची सुविधा देते.
  • खरेदीदारांशी थेट संपर्क: कारागीर आणि विणकर थेट खरेदीदारांशी जोडले जातात, त्यामुळे मध्यस्थाची गरज पडत नाही आणि योग्य मोबदला मिळण्यास मदत होते.
  • अधिक प्रसिद्धी: हे व्यासपीठ हस्तनिर्मित उत्पादने मोठ्या ग्राहक वर्गासमोर सादर करते, त्यामुळे विक्रेत्यांसाठी बाजारपेठेच्या संधी वाढतात.
  • डिजिटल सक्षमीकरण: कारागीर आणि विणकरांना ऑनलाइन व्यापारात अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी डिजिटल साधने आणि प्रसिद्धी प्रदान केली जाते.
  • आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण: वाढीव बाजारपेठेमुळे उपजीविका मजबूत होते आणि उत्पन्नाच्या संधी वाढतात.
  • सांस्कृतिक वारशाचे जतन: विविध प्रकारच्या हस्तकला-आधारित उत्पादनांमुळे भारताचा समृद्ध हस्तनिर्मित वारसा जिवंत राहतो आणि पारंपरिक कारागिरीची कौशल्ये भावी पिढ्यांसाठी जतन करण्यास मदत होते.

इंडियाहँडमेडला काय वेगळे ठरवते

हे पोर्टल विश्वास, सुलभता आणि विक्रेत्यांचे सक्षमीकरण यावर आधारित आहे. हे एक असे सुलभ व्यासपीठ उपलब्ध करुन देते, जिथे कारागीर आणि विणकर खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकतात आणि खरेदीदार अधिक आत्मविश्वासाने हस्तनिर्मित उत्पादने शोधू शकतात.

हस्तकलेतील विविधता आणि प्रादेशिक ओळख

हे व्यासपीठ दैनंदिन हस्तनिर्मित उत्पादने आणि मान्यताप्राप्त प्रादेशिक हस्तकलांसाठी एक निवडक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देते. यामध्ये कपडे, गृहसजावट, सजावटीच्या वस्तू, चित्रे, फर्निचर, धार्मिक वस्तू, स्टेशनरी, संगीत वाद्ये, दागिने, बॅग आणि पादत्राणे यांसारख्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.

हे जीआय-टॅग्ड (GI-tagged) आणि ओडीओपी उत्पादनांसारख्या विशेष उत्पादन श्रेणी देखील ठळकपणे दर्शवते. यामुळे मान्यताप्राप्त प्रादेशिक हस्तकलांना अधिक प्रसिद्धी आणि एक विशिष्ट ओळख मिळते.

जीआय-टॅग्ड उत्पादने

जीआय-टॅग्ड उत्पादनांना भौगोलिक संकेत असतो, जो त्यांना एका विशिष्ट प्रदेश, गुणवत्ता आणि प्रतिष्ठेशी जोडतो. हे व्यासपीठ ऐपन कला, शुद्ध पश्मिना शाली, डोकरा सजावट आणि मुंडू उत्पादने यांसारखी विविध जीआय-टॅग्ड उत्पादने सादर करते.

ओडीओपी उत्पादने

पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाची ओळख करून देतो आणि त्या उत्पादनाला प्रोत्साहन देतो. या व्यासपीठावर तंगाईल साड्या, बनारसी रेशीम उत्पादने, इकत, टसर रेशीम साड्या, चंदेरी रेशीम आणि टेराकोटा उत्पादने उपलब्ध आहेत.'एक जिल्हा एक उत्पादन' (ओडीओपी) हा उपक्रम संतुलित प्रादेशिक विकासाला

विश्वास निर्माण करणे आणि विक्रेत्यांचा सहभाग सुलभ करणे

उत्तम उपलब्धता, उत्तम हमी: मोफत शिपिंग, खरेदी संरक्षण, सुरक्षित पेमेंट व्यवस्था आणि खरेदीदार सहाय्य यंत्रणांद्वारे खरेदीदारांना अधिक विश्वासार्ह खरेदीचा अनुभव मिळतो. तसेच, स्पर्धात्मक किमतीत हस्तनिर्मित उत्पादने उपलब्ध करून देऊन विश्वास अधिक दृढ केला जातो.

विक्रेत्यांसाठी सोपे ऑनबोर्डिंग: हे व्यासपीठ कारागीर, विणकर आणि उत्पादक संस्थांना बाजारपेठत प्रवेश करण्यासाठी एक मार्गदर्शित नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देते.

लहान विक्रेत्यांना डिजिटल व्यापारात समाविष्ट करणे

जीएसटी नोंदणी नसलेले विक्रेते एनरोलमेंट आयडी वापरून नोंदणी करू शकतात, मात्र अशा विक्रेत्यांना केवळ त्यांच्या स्वतःच्या राज्यात विक्री करता येते. यामुळे हे पोर्टल लहान कारागीर आणि प्रथमच डिजिटल विक्री करणाऱ्यांसाठी अधिक समावेशक आणि सुलभ बनते.

बाजारपेठे मागील यशोगाथा

या व्यासपीठामागे असे कारागीर, विणकर आणि उद्योग आहेत, जे डिजिटल व्यापाराच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक हस्तकलीला नवीन ओळख आणि व्यापक बाजारपेठ मिळवून देत आहेत.

सॅंटआर्म्स आपल्या हस्तनिर्मित उत्पादनांद्वारे दैनंदिन जीवनात उबदारपणा आणि कलात्मकता आणते. लाकडी सजावटीच्या वस्तू आणि सुगंधी मेणबत्त्या, टेराकोटा दिवे, संगमरवरी मूर्ती आणि हातमागाच्या साड्या अशा विविध उत्पादनांमधून आपलेपणा, परंपरा आणि सौंदर्याचा एक शांत मिलाफ दिसून येतो.

दस्तकार क्राफ्ट 500 हून अधिक कारागिरांचे कौशल्य आधुनिक घरापर्यंत पोहोचवते. ते वेत आणि बांबूपासून तयार केलेल्या उच्च-गुणवत्तेच्या, निर्यात-योग्य वस्तूंद्वारे भारताच्या वारशाचा गौरव करतात आणि त्याच वेळी आधुनिक जीवनशैलीमध्ये सहजपणे सामावून जातात. 

व्हिलेज क्राफ्ट हातमाग परंपरेचा साधेपणा आणि सामर्थ्य साजरे करते. त्यांच्या कुशल कारागिरांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेल्या सुती टॉवेल, गमछे आणि बेडशीट अशा रोजच्या वापरातील वस्तूंना आराम, गुणवत्ता आणि वारसा असलेल्या उत्पादनांमध्ये रूपांतरित करतात.

या यशोगाथा हस्तनिर्मित उत्पादनांना एक मानवी स्पर्श देतात. तसेच, परंपरा, कौशल्य आणि उपजीविका यांचा सुंदर संगम डिजिटल बाजारपेठेत कसा घडतो याचे प्रभावी उदाहरण ठरतात. 

भारतीय वारसेला  डिजिटल भविष्याशी जोडणारी व्यासपीठ 

इंडियाहँडमेड हे डिजिटल इंडिया अभियानाच्या भावनेचे प्रतिबिंब आहे, जे हस्तकलेला उपजीविकेचा स्रोत आणि भारताच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतिबिंब म्हणून दर्शवते. 60 लाखांहून अधिक कारागिरांना सामील करून घेण्याच्या योजनेसह, हे व्यासपीठ आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पाठबळ देते. हे कारागिरांना आणि विणकरांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देते, तसेच खरेदीदारांना विश्वास आणि सहजतेने हस्तनिर्मित उत्पादने शोधण्यात मदत करते.

प्रत्येक हस्तनिर्मित उत्पादनाद्वारे भारताचा समृद्ध हस्तकला वारसा, कारागिरांचे कौशल्य आणि नव्या संधींची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य इंडियाहॅन्डमेड सातत्याने करत आहे.  

References:

Ministry of Electronics & Information Technology:

https://www.digitalindia.gov.in/initiative/india-handmade/

Ministry of Commerce & Industry:

https://ipindia.gov.in/page-content/geographical-indications-an-introduction

Ministry of Textiles:

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2152551&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1919216&reg=48&lang=2

Ministry of Development of North-East Region:

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2201421&reg=48&lang=2

Indiahandmade Platform:

https://www.indiahandmade.com

https://www.indiahandmade.com/marketplace/?srsltid=AfmBOookWpSt6aCR_kyx8SK_SyVuchTGhk8pJGa7WO7Bq1SdXhXPQ1vL&utm_source=chatgpt.com#account_info

https://www.indiahandmade.com/static/version1782981084/frontend/ESHILP/theme/en_US/images/SOP_Seller-Registration-English.pdf

PIB Archives:

https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?ModuleId=3&NoteId=156396&id=156396&lang=1&reg=3

Click here to see pdf 

***

AmbadasYadav / ShradhhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(तथ्य सामग्री आईडी: 150749) आगंतुक पटल : 9


Provide suggestions / comments
इस विश्लेषक को इन भाषाओं में पढ़ें : English , हिन्दी , Urdu , Assamese , Malayalam , Bengali , Kannada