Infrastructure
भारतातील अति-वेगवान रेल्वेचे भवितव्य: विस्तारासाठी एका प्रमाणित मार्गाची निर्मिती
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2026 16:30 PM
जलद, विश्वसनीय आणि उत्कृष्ट संपर्क साधणारा रेल्वे प्रवास
मुंबई-अहमदाबाद अति-वेगवान रेल्वे (MAHSR) कॉरिडॉर हा भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. हा प्रकल्प देशातील अति-वेगवान रेल्वे वाहतुकीचे भविष्य घडवणारा आहे. या गाड्यांचा रचित वेग ताशी 350 किलोमीटरपर्यंत आहे, जो वंदे भारत गाड्यांच्या ताशी 180 किलोमीटरच्या रचित वेगापेक्षा खचितच जास्त आहे.
MAHSR प्रकल्पाच्या आधारे, देशभरातील आगामी बुलेट ट्रेन कॉरिडॉर्ससाठी एक प्रमाणित आराखडा (स्टँडर्डाइज्ड टेम्पलेट) विकसित केला जात आहे. यशस्वी ठरलेले अभियांत्रिकी आराखडे, बांधकाम पद्धती आणि कार्यपद्धती यांची अंमलबजावणी करणे, हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे. यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही गती मिळेल. अशा प्रकारे हा MAHSR प्रकल्प एका मोठ्या परिवर्तनाची पायाभरणी करतो आहे.
एकीकृत आराखडे, घटक आणि देखभाल प्रक्रिया यांच्यामुळे संपूर्ण नेटवर्कमध्ये सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) व्यवस्थापन, प्रशिक्षण आणि खरेदीची प्रक्रिया सुलभ होईल. भविष्यातील अति-वेगवान रेल्वे कॉरिडॉर्ससाठी 'पुन्हा वापरता येण्याजोग्या' बांधकाम पद्धतीचा अवलंब केला जाईल. प्रकल्पाच्या ठिकाणच्या मातीच्या विशिष्ट गुणधर्मांनुसार पायाची रचना केली जाईल, तर उर्वरित उप-प्रणालींसाठी समान अभियांत्रिकी मानकांचे पालन केले जाईल. यामध्ये पियर्स (खांब), व्हायडक्ट्स (उंच पूल), ट्रॅक, स्थानकाची रचना, ओव्हरहेड विद्युतीकरण आणि सिग्नलिंग प्रणाली यांचा समावेश असेल. या दृष्टिकोनामुळे भविष्यातील कॉरिडॉर्सच्या बांधकामाला गती मिळेल, तसेच कामाचा दर्जा सुधारेल आणि खर्चही कमी होईल.
| 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमांतर्गत, भारतीय रेल्वे स्वदेशी अति-वेगवान रेल्वे उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. आयात केलेल्या प्रणाली आणि घटकांवरील अवलंबित्व कमी करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) च्या सहकार्याने, 280 किमी प्रतितास वेग असणाऱ्या स्वदेशी अति-वेगवान रेल्वे संचाची रचना आणि उत्पादन करत आहे. भविष्यातील अति-वेगवान रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली अवजारे, चाचणी आणि उत्पादन परिसंस्था देखील देशात विकसित केली जात आहे. भारतीय कंपन्या अति-वेगवान रेल्वेसाठी आवश्यक असलेले विशेष घटक, बांधकाम उपकरणे आणि स्लॅब-ट्रॅक प्रणाली यांचे उत्पादन वाढत्या प्रमाणात करत आहेत. बंगळूरुमध्ये नव्याने उद्घाटन झालेले 'आदित्य' हे विशेष संकुल, बी-28 डब्यांच्या विकासासाठी तयार करण्यात आले आहे. आयआयटींचे संशोधन, विशेष प्रशिक्षण आणि जपानी अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब यामुळे भारताची अति-वेगवान रेल्वे क्षमता मजबूत होत आहे. यामुळे स्थानिकीकरणाला आणखी बळकटी मिळत आहे. |

मुंबई-अहमदाबाद अति-वेगवान रेल्वे कॉरिडॉर
मुंबई-अहमदाबाद अति-वेगवान रेल्वे (MAHSR) कॉरिडॉरमुळे भारत अति-वेगवान रेल्वेच्या युगात पदार्पण करत आहे. देशातील पहिलाच समर्पित 'बुलेट ट्रेन' कॉरिडॉर असल्याने, यात प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांचा समावेश करण्यात आला आहे.
- हा कॉरिडॉर मुंबई - अहमदाबाद अंतर सुमारे 1 तास 58 मिनिटांत पार करेल.
- याची एकूण लांबी सुमारे 508 किलोमीटर इतकी आहे.
- या मार्गावर 12 स्थानके नियोजित आहेत.
- पहिली अति-वेगवान रेल्वे सेवा ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. यात सर्वप्रथम सुरत ते वापी हा विभाग कार्यान्वित केला जाईल.
- या कॉरिडॉरचा रचित वेग 350 किमी/तास आणि प्रत्यक्ष परिचालन गती 320 किमी/तास इतकी आहे. याला प्रगत रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि ट्रेन नियंत्रण प्रणालींचे पाठबळ लाभले आहे.

MAHSR ची तांत्रिक वैशिष्ट्ये आणि प्रणाली
'शिंकांसेन' हे जपानी तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा वापर करून MAHSR प्रकल्प विकसित केला जात आहे. या कॉरिडॉरमध्ये ट्रॅक्शन (कर्षण), विद्युतीकरण, ट्रॅक पायाभूत सुविधा आणि परिचालन यांसाठी प्रगत प्रणालींचा समावेश आहे. यातील प्रमुख तांत्रिक घटकांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE): या कॉरिडॉरवर 20,000 पेक्षा जास्त OHE मास्ट (खांब) उभारण्याचे नियोजन आहे. येथील 2×25 kV ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली ही शिंकांसेन-शैलीतील OHE कॅन्टिलिव्हर डिझाइनवर आधारित आहे.
- ट्रॅक्शन आणि वीज पुरवठा: या प्रकल्पात 12 ट्रॅक्शन सबस्टेशन्स, 2 डेपो ट्रॅक्शन सबस्टेशन्स आणि 16 वितरण सबस्टेशन्सचा समावेश आहे.
- ट्रॅक प्रणाली: भारतात प्रथमच 'जे-स्लॅब बॅलस्टलेस ट्रॅक' (J-Slab ballastless track) तंत्रज्ञान आणले जात आहे.
- ट्रॅक बांधकाम तळ: यासाठी विशेष ट्रॅक बांधकाम तळ विकसित केले जात आहेत. हे तळ रूळ, ट्रॅक स्लॅब्स, यंत्रसामग्री आणि इतर उपकरणांच्या साठवणुकीसाठी तसेच हाताळणीसाठी वापरले जातील.
- रोलिंग स्टॉक डेपो: गुजरातमध्ये साबरमती आणि सुरत येथे, तसेच महाराष्ट्रात ठाणे येथे असे तीन डेपो उभारले जात आहेत.
सात अति-वेगवान रेल्वे कॉरिडॉर्स
भारत आपल्या 'अति-वेगवान रेल्वे' विस्ताराची व्याप्ती मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरच्या पलीकडे नेत आहे. भविष्यातील विकासासाठी सुमारे 4,000 किलोमीटर लांबीचे सात 'अति-वेगवान रेल्वे कॉरिडॉर निश्चित करण्यात आले आहेत. या प्रस्तावित नेटवर्कमुळे सुमारे 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.
प्रस्तावित सात अति-वेगवान रेल्वे कॉरिडॉर देशाच्या विविध भागांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या विभागलेले आहेत:
|
मार्ग
|
प्रवासासाठी लागणारा वेळ
|
|
दिल्ली-वाराणसी
|
3 तास 50 मिनिटे
|
|
वाराणसी-पाटणा-सिलिगुडी
|
2 तास 55 मिनिटे
|
|
चेन्नई-बेंगळुरू
|
1 तास 13 मिनिटे
|
|
बेंगळुरू-हैदराबाद
|
2 तास
|
|
चेन्नई-हैदराबाद
|
2 तास 55 मिनिटे
|
|
मुंबई-पुणे
|
48 मिनिटे
|
|
पुणे-हैदराबाद
|
1 तास 55 मिनिटे
|
राष्ट्रीय अति-वेगवान रेल्वे नेटवर्कच्या दिशेने
मुंबई-अहमदाबाद अति-वेगवान रेल्वे प्रकल्प हा भारताच्या परिवहन क्षेत्राच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा प्रकल्प भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक असलेले ज्ञान, क्षमता आणि औद्योगिक परिसंस्था विकसित करत आहे. या महत्त्वपूर्ण कॉरिडॉरमधून मिळालेल्या अनुभवाचा भारत लाभ घेतो आहे आणि भविष्यातील अति-वेगवान रेल्वे विस्तारासाठी एक विस्तारक्षम कार्यपद्धती तयार करत आहे. ही कार्यपद्धती देशभरातील आगामी अति-वेगवान रेल्वे मार्गांसाठी उपयुक्त ठरू शकते. नवीन कॉरिडॉर विकसित होतील, तसतसा हा पाया संपर्कक्षमता सुधारण्यास मदत करेल. त्याचबरोबर यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना मिळण्यासही मदत होईल.
संदर्भ
रेल्वे मंत्रालय
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2257831®=1&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2267962®=48&lang=1
https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/187/AS538_MhnJmI.pdf?source=pqals
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2255527®=48&lang=2
नॅशनल हाय-स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
https://www.nhsrcl.in/en/project/project-overview
https://www.nhsrcl.in/en/media/press-release
पत्र सूचना कार्यालय
https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=157295&ModuleId=3®=3&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2272190®=48&lang=1
इतर
https://newsonair.gov.in/first-bullet-train-to-run-between-mumbai-ahmedabad-on-15-august-2027-says-ashwini-vaishnaw/
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
NehaKulkarni / MadhuriPange / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(तथ्य सामग्री आईडी: 150751)
आगंतुक पटल : 20
Provide suggestions / comments