Social Welfare

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026

प्रविष्टि तिथि: 06 OCT 2026 17:28 PM

नवी दिल्ली ते आईची- नागोया पर्यंतचा भारताचा प्रवास

 

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026- दृष्टिक्षेपात

आशियाई क्रीडा स्पर्धा, जी एशियाड नावाने ही लोकप्रिय आहे, ती आशिया खंडातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून, ती दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. ओसीए म्हणजेच आशियाई ऑलिंपिक परिषदेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये, सध्या 45 देश किंवा प्रदेश सहभाग घेतात. विसावी आशियाई क्रीडा स्पर्धा, जपानच्या आईची-नागोया इथे, 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या स्पर्धेचे अधिकृत घोषवाक्य होते, “एका आशियाची कल्पना करा.” (“Imagine One Asia.”) जपानने तिसऱ्यांदा या आशियाई स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले होते, या आधीच्या दोन स्पर्धा, टोक्यो (1958) आणि हिरोशिमा (1994) इथे भरवण्यात आल्या होत्या.

स्पर्धांमधले महत्वाचे सामने, 16 दिवसांत झाले, या काळात जवळपास सर्वच क्रीडाप्रकारात जागतिक दर्जाच्या आणि अटीतटीच्या  क्रीडास्पर्धा झाल्या. यात 43 क्रीडा प्रकार आणि 71 शाखांचा समावेश असून, अॅथलेटिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन या खेळातून झाले. सर्वच 469 अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यानंतर, एकूण 1,407 पदके देण्यात आली.

आशियाई स्पर्धांसोबतच, जपानकडे पाचव्या आशियाई पॅरा स्पर्धांचेही यजमानपद असून ह्या स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2026 या काळात, आईची-नागोया इथे होणार आहेत. जपानमध्ये पहिल्यांदाच पॅरा स्पर्धा होणार आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या बोधचिन्हाचा अर्थ समजून घेणे

अधिकृत बोधचिन्हाचा रंग आणि रेखाचित्र तयार करतांना, स्थानिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित करण्यात आले असून, त्याची क्रीडाक्षेत्राच्या गतिमानतेशी सांगड घालण्यात आली आहे. त्यावरचे वक्र आकार,चैतन्याचे प्रतिनिधित्व करतात, तर मध्यम भागावरच्या जांभळ्या, सोनेरी आणि हरित रंगाच्या रेषा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या एकतेची कल्पना असून, ते आशियाई ऑलिंपिक परिषदेचे प्रतीक असलेल्या प्रकाशमान लाल सूर्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जांभळा रंग, आईची प्रांताच्या प्रादेशिक फुलाचे, म्हणजेच आयरिसचे, प्रतीक आहे. सोनेरी रंग नागोया किल्ल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सोनेरी ‘किनशाची’ या वाघ-माशाच्या आकाराच्या छतावरील अलंकारांचे प्रतीक आहे. तर हिरवा रंग आयची-नागोया परिसरातील दृढ पर्यावरणीय जाणीव दर्शवतो. ही पर्यावरणविषयक जागरूकता एक्सपो 2005 आईची, COP10 आणि ईएसडी वरील युनेस्को जागतिक परिषद यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे अधिक दृढ झाली आहे.

या प्रतीकचिन्हामध्ये आशिया, आईचीआणि नागोया या नावांची आद्याक्षरेही समाविष्ट करण्यात आली आहेत. “A” हे जांभळ्या वक्र रेषेत आणि मध्यवर्ती रेषेत दर्शवले आहे, तर “N” हे जांभळ्या आणि सोनेरी रंगात दर्शवण्यात आले आहे.

 

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अधिकृत शुभंकर

“होनोहोन” हा 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा शुभंकर असून, तो खेळाडूंच्या ज्वलंत उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो. या नावाची उत्पत्ती जपानी भाषेतील ‘होनोहो’ या शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा संबंध ज्यापासून जपानी भाषेतील ‘ज्वाला’ या शब्दाची उत्पत्ती झाली, त्या शब्दाशी आहे. त्याची रचना नागोया किल्ल्याचे वैशिष्ट्यपूर्ण प्रतीक आणि आयची-नागोयाचे रक्षणकर्ते दैवत मानल्या जाणाऱ्या शाचिहोकोपासून प्रेरित आहे.

 

1951 मधील पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा: भारताची संस्थापक म्हणून भूमिका

आशियाई क्रीडा स्पर्धांशी भारताचे नाते अगदी सुरुवातीपासूनचे आहे, कारण पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, 1951 साली नवी दिल्लीतच झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, जागतिक पार्श्वभूमीवर, आशियाई देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या, कारण त्यावेळी, आशियातील अनेक देश, नुकतेच वसाहतवादाच्या गुलामीतून स्वतंत्र झाले होते. त्यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेची कल्पना भारताने मांडली, त्यामागे, महायुद्धाने आशियाई राष्ट्रांमधील खंडित केलेल्या, विश्वासाचे आणि एकतेचे धागे पुन्हा जोडण्याचा विचार होता. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतील भारताचे सदस्य, प्रो, जी.डी. सोंधी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धांची कल्पना पहिल्यांदा मांडली. नवी दिल्लीत 1947 साली, आशियाई देशांची परिषद झाली, त्यात ही सूचना मांडण्यात आली आणि त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धा म्हटले जावे, असा निर्णय घेण्यात आला.

पहिली स्पर्धा, नवी दिल्लीत मार्च 1951 साली आयोजित करण्यात आली. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यावेळी, या पहिल्या स्पर्धेत, अकरा देशांमधले 489 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत जपान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानी होता. तेव्हापासूनच, ही स्पर्धा, आशियाई देशांमधील मैत्री वृद्धिंगत करणारा आणि विविधतेचा सन्मान करत, जागतिक शांततेत महत्वाचे योगदान देणारा महत्वाचा उपक्रम ठरली.

आईची- नागोया 2026 स्पर्धेत भारताचा चमू

यंदाच्या क्रीडा स्पर्धेत, भारताने आपले आजवरचे सर्वात मोठे आणि सर्वाधिक क्रीडा प्रकारांचे प्रतिनिधित्व करणारे क्रीडा पथक पाठवले होते. यावेळी, 36 विविध क्रीडा शाखांमधील 501 अॅथलिट या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी एकूण खंडातील 300 पेक्षा जास्त खेळाडू, आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच उतरणारे होते.

संघ स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी आठ सप्टेंबर 2026  रोजी नवी दिल्ली येथे भव्य  समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा डॉ. पी. टी. उषा आणि पथकाचे प्रमुख  सहदेव यादव उपस्थित होते. यावेळी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पूर्वी डॉ. मनसुख मांडविया (मध्यभागी) यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ. पी. टी. उषा (उजवीकडे) आणि क्रीडा सचिव हरि रंजन राव (डावीकडे) यांच्या उपस्थितीत भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले.

छायाचित्र स्रोत : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

 

19 सप्टेंबर 2026  रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी भारतीय पथकाचे संचलन केले.

आईची-नागोया 2026 मध्ये भारताची सुवर्णपदकांची शानदार कामगिरी

2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या मोहिमेत एकूण 21 सुवर्णपदकांची कमाई हे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अचूकता आणि कौशल्यावर आधारित क्रीडा प्रकार तसेच सांघिक खेळांमध्ये भारताने दमदार कामगिरी केली. तिरंदाजीत भारताने सर्वाधिक पाच सुवर्णपदके जिंकली, तर नेमबाजी आणि बॉक्सिंगमध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवली.

सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, हॉकी आणि कबड्डी या तिन्ही क्रीडा प्रकारांत भारताने सुवर्णपदकांची शानदार मालिका कायम ठेवत प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. उल्लेखनीय कामगिरीमध्ये पुरुष क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव केला. पुरुष हॉकी संघाने मलेशियावर 5-1 असा दणदणीत विजय मिळवत आपले आशियाई विजेतेपद कायम राखले. तसेच पुरुष आणि महिला या दोन्ही कबड्डी स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदके जिंकली.

याशिवाय कुस्तीतील दोन, ॲथलेटिक्समधील एक आणि गोल्फमधील एका सुवर्णपदकामुळे भारताची एकूण सुवर्णपदकांची संख्या 21 वर पोहोचली. या उत्तम क्रीडा प्रदर्शनातून, आशियाई क्रीडा क्षेत्रात भारताची विविध क्रीडा प्रकारांमधील भक्कम आणि सर्वांगीण कामगिरी अधोरेखित झाली.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये क्रीडाप्रकारानुसार भारताची पदकसंख्या  

क्रीडा प्रकार 

सुवर्ण 

रौप्य 

कांस्‍य

कुल

ॲथलेटिक्स

1

9

14

24

नेमबाजी 

3

8

4

15

तिरंदाजी 

5

2

2

9

मुष्टियुद्ध 

3

0

3

6

कुस्ती 

2

2

2

6

स्क्वॅश 

0

2

3

5

नौकानयन

0

1

2

3

क्रिकेट

2

0

0

2

हॉकी

2

0

0

2

कबड्‌डी

2

0

0

2

गोल्‍फ

1

1

0

2

भारोत्तोलन

0

1

0

1

वुशु

0

1

0

1

बॅडमिंटन 

0

0

1

1

कुराश 

0

0

1

1

मिश्रित मार्शल आर्ट

0

0

1

1

रोइंग

0

0

1

1

सेपक टकरा

0

0

1

1

सॉफ्ट टेनिस

0

0

1

1

टेबल टेनिस

0

0

1

1

एकूण 

21

27

37

85

आईची-नागोया 2026 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताचा सहभाग 

जपानमध्ये, आयची-नागोया 2026 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 18 ते 24 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित केल्या जातील.  आशियातल्या 45 राष्ट्रीय पॅरालिम्पिक समित्यांचे सुमारे 3,000 खेळाडू यात भाग घेण्याची अपेक्षा असून अठरा पॅरा क्रीडाप्रकार असतील.  

भारत या स्पर्धेसाठी आपली अधिकृत राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती असलेल्या भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या माध्यमातून सहभागी होईल. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये भारत पाचव्यांदा सहभागी होत आहे. हांगझोऊ 2022 आशियाई पॅरा गेम्समध्ये 29 सुवर्णपदकांसह एकूण 111 पदके जिंकण्याचा विक्रम भारताने केला होता.   या 111   पदकांपैकी महिला खेळाडूंनी 40 पदके (एकूण पदकांच्या 36%) जिंकली होती. यापूर्वी, भारताने 2010 मध्ये 14,  2014 मध्ये 33 आणि 2018 मध्ये 72 पदके जिंकली होती.

 

पायथा ते शिखर : क्रीडा क्षेत्रासाठी भारताचे धोरणात्मक पाऊल 

खेलो भारत नीती 

सरकारने भारताचे राष्ट्रीय क्रीडा धोरण म्हणून 1 जुलै 2025 रोजी खेलो भारत नीती जाहीर केली. याचा उद्देश चांगली, समावेशक आणि कामगिरी आधारित क्रीडा व्यवस्था उभारणे,  हा आहे. प्रशिक्षणाच्या सुविधा आणि संधींबाबत ग्रामीण व शहरी भागांमधील तफावत दूर करण्यावर यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी समुदाय सहभाग आणि भागीदारीला यात प्राधान्य दिले आहे. हे धोरण 2036 च्या ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवते.  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत क्रीडा क्षेत्राला शालेय शिक्षणाशी जोडले गेले आहे. तसेच, महिला, आदिवासी समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींनाही या धोरणाद्वारे पाठबळ पुरवण्यात येत आहे. 

विक्रमी वित्तीय साहाय्य 

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा मंत्रालयासाठी विक्रमी 4,479.88 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. 2013-14 मध्ये ती 1,219 कोटी रुपये होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 ते  2030-31 साठी सुधारित खेलो इंडिया योजनेला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना पाठबळ देण्यासह यासाठीची एकूण तरतूद 36,441 कोटी रुपये आहे. केवळ खेलो इंडियासाठीच 924.35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी  2021–22 ते  2025–26 या कालावधीसाठी या योजनेचा खर्च 3,790.50 कोटी रुपये होता.  अर्थसंकल्पात क्रीडा सामग्रीच्या निर्मितीसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 

प्रतिभा तात्काळ ओळखणे 

खेलो इंडिया, हा प्रारंभिक स्तरासाठी राबवण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जुलै 2026 पर्यंत 1,067 खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.  3,176 कोटी रुपये खर्चाच्या 349 नव्या क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हा उपक्रम 2,745 खेलो इंडिया खेळाडूंना प्रशिक्षण, साधने, वैद्यकीय देखभाल आणि  मासिक भत्ता यांसह साहाय्य करतो. 2018 पासून 63,000 हून अधिक खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला आहे. 

खेलो इंडिया उभरत्या प्रतिभेचा शोध उपक्रम 9 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींच्या प्रतिभेचा शोध घेतो आणि तिचे संवर्धन करतो. या उपक्रमाअंतर्गत 174 प्रतिभा मूल्यमापन केंद्रे, निष्पक्ष, गुणवत्ता आधारित निवडीसाठी डेटा टूल्सचा वापर करतात. 

आघाडीच्या खेळाडूंना पाठबळ 

टॉप्स अर्थात टार्गेट पोडियम स्कीम देशाच्या खेळाडूंना पाठबळ पुरवते. परदेशी प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि विशेष साधनांच्या माध्यमातून ही योजना खेळाडूंना साहाय्य करते. योजनेत, खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये स्टायपेंड दिले जाते. डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये ज्युनिअर ऍथलिटना महिन्याला दरमहा 25,000 रुपये मिळतात.  एप्रिल 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार टॉप्स 55 कोअर ऍथलिट, 62 पॅरा कोअर ऍथलिट आणि 140 डेव्हलपमेंट ऍथलिटना साहाय्य करते. याव्यतिरिक्त 67 कोअर ऍथलिटस हॉकीमधले आहेत. टोक्यो 2020 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये टॉप्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

शिक्षण, तंदुरुस्ती आणि निष्पक्ष खेळ 

इम्फाळ येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना 2018 मध्ये झाली. हे विद्यापीठ क्रीडा विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण या क्षेत्रात शिक्षण देते. 

फिट इंडिया चळवळ तंदुरुस्तीला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यास प्रोत्साहित करते. संसदेने ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्रीय क्रीडा नियमन विधेयक मंजूर केले. यात क्रीडा संस्थांच्या मान्यतेसाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळाची, तसेच क्रीडा विवादांच्या निराकरणासाठी राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरणाची तरतूद  आहे.  

आयची-नागोया पलीकडे: भारताचा ऑलिम्पिकच्या वाटेवर प्रदीर्घ पल्ला 

आईची-नागोया 2026 स्पर्धा, लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांसाठीच्या बृहत आराखड्यामधला एक टप्पा आहेत. भारताच्या पाचशेहून अधिक खेळाडूंपैकी तीनशेहून अधिक यंदा आशियाई खेळांमध्ये पदार्पण करणारे आहेत. प्रथमच सहभागी खेळाडूंची ही मोठी संख्या देशाच्या क्रीडा क्षेत्रातली वाढती गुणवत्ता, विस्तारणारा पाया दर्शवते. 

देशभरात क्रीडा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सरकारने 36,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची दहा वर्षांची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश 2036 पूर्वी जागतिक क्रीडा पटलावर भारताला स्थापित  करण्याचा आहे. क्रीडा मंत्रालयाने महासंघ, राज्ये आणि इतर संबंधित घटकांना सामावून घेणाऱ्या एका समन्वित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्यकता व्यक्त केली. 

आयची-नागोया येथे 21 सुवर्णपदकांसह 85 पदकांची भारताची कमाई, हा देशाच्या क्रीडा प्रवासातला आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे.  पारंपरिक बलस्थाने आणि नव्याने विकसित होत असलेल्या क्रीडा प्रकारांमधील दमदार कामगिरी यांसह, या स्पर्धेने, लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक आणि इतर दीर्घकालीन क्रीडा महत्त्वाकांक्षा, यासाठीच्या भारताच्या  प्रयत्नांना नवी ऊर्जा दिली आहे. 

References

Ministry of Youth Affairs and Sports

 https://yas.gov.in/sites/default/files/Asian_Games_sanction_for_coaches_and_suppor_ staff.pdf

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2307999&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1972615&lang=2&reg=48&utm

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2149334&reg=48&lang=2

Asian Games 2026 Official Website

https://www.aichi-nagoya2026.org/history-of-the-games/

https://www.aichi-nagoya2026.org/official-mascot/

https://www.aichi-nagoya2026.org/games-emblem-slogan-core-graphics/

Olympic Council of Asia Official Website

https://oca.asia/games/111-aichi-nagoya-2026.html?utm

https://oca.asia/news/7738-asia-ready-to-shine-as-aichi-nagoya-to-host-historic-20th-asian-games.html?utm

Paralympic India Official Website

https://www.paralympicindia.com/aichi-nagoya-asian-para-games-2026

International Paralympic Committee

https://www.paralympic.org/news/aichi-nagoya-2026-celebrates-100-days-go-until-asian-para-games

https://www.paralympic.org/news/aichi-nagoya-host-2026-asian-para-games

Govt. of Japan

https://www.gov-online.go.jp/hlj/en/january_2026/january_2026-08.html

Consortium for Educational Communication

https://cec.nic.in/webpath/curriculum/Module/BPED/Paper01/9/downloads/script.pdf

News on AIR

https://newsonair.gov.in/manu-bhaker-tajinderpal-singh-toor-named-indias-flagbearers-for-asian-games-2026/

https://newsonair.gov.in/20th-asian-games-officially-opened-at-mizuho-park-athletic-stadium-in-japan/

https://newsonair.gov.in/india-gears-up-for-2028-olympics-with-strategic-preparations-union-minister-mansukh-mandaviya/

https://newsonair.gov.in/indian-contingent-for-asian-games-2026-receives-grand-send-off-in-new-delhi/

https://newsonair.gov.in/rajya-sabha-takes-up-national-sports-governance-and-anti-doping-amendment-bills-2025/

PIB Backgrounder

https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=154856&ModuleId=3&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2293849&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=154601&ModuleId=3&reg=48&lang=2

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2293849&reg=48&lang=2                               

https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=154856&ModuleId=3&reg=48&lang=2

Click here to see pdf 

***

RadhikaAghor / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(तथ्य सामग्री आईडी: 151108) आगंतुक पटल : 87


Provide suggestions / comments
इस विश्लेषक को इन भाषाओं में पढ़ें : English , हिन्दी , Assamese , Urdu , Bengali , Malayalam , हिन्दी , Kannada