Infrastructure
वेळेची बचत, प्रवासाचे अंतर कमी
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2026 12:37 PM
भारतातील पायाभूत सुविधा ठिकाणांना अधिक जवळ कसे आणत आहेत
तासांची बचत : संपर्क सुविधेचे मोजमाप
कोट्यवधी प्रवाशांसाठी उत्तम संपर्क सुविधेचे मोजमाप केवळ किती किलोमीटरचे रस्ते किंवा मार्ग बांधले गेले यावर होत नाही, तर प्रवासात किती तासांची बचत झाली यावरही होते. संपूर्ण भारतात नवे पूल, बोगदे, द्रुतगती मार्ग आणि रेल्वे सेवा शहरांदरम्यान, प्रदेशांदरम्यान तसेच समुदायांदरम्यान प्रवासासाठी लागणारा वेळ बदलत आहेत. वळणाचे मार्ग, अवघड भूप्रदेश आणि संथ मार्ग यांची जागा थेट आणि अधिक वेगवान संपर्कमार्ग घेत असल्याने, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून होत असलेले परिवर्तन दैनंदिन प्रवासात स्पष्टपणे जाणवू लागले आहे. देशाच्या अधिकाधिक भागांपर्यंत वेगवान संपर्कमार्ग पोहोचत असल्याने, दैनंदिन प्रवासासाठीचे अंतर ही पूर्वीइतकी मोठी अडचण राहिलेली नाही.
पूल : अडथळे दूर करणारे, प्रवासाचा वेळ कमी करणारे
पूल उभारल्यामुळे नद्या ओलांडण्यासाठी लागणारा दीर्घ आणि संथ प्रवास कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वी तासन्तास लागणारे प्रवास आता खूपच कमी वेळात पूर्ण होत आहेत.

6 तास → 1 तास
आसाममधील रुपाई आणि अरुणाचल प्रदेशातील मेका/रोईंग यांच्यातील प्रवासाचा वेळ 6 तासांवरून 1 तास झाला आहे. त्यामुळे 5 तासांची बचत झाली आहे.
दिवसभराचा प्रवास → 1–2 तास
ब्रह्मपुत्रा नदीवरील या रेल्वे सह रस्ते पुलामुळे धेमाजी आणि दिब्रुगड यांच्यातील संपर्क सुविधेत आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी जवळपास संपूर्ण दिवस लागणारा प्रवास आता सुमारे 1 ते 2 तासांत पूर्ण होतो.
2 तास → 20 मिनिटे
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान थेट संपर्क निर्माण झाला असून, प्रवासाचा वेळ सुमारे 20 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.
8 तास → 30 मिनिटे
कोसी रेल महासेतूमुळे निर्मली आणि सरायगढ यांच्यातील रेल्वे प्रवासाचा वेळ सुमारे 8 तासांवरून 30 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रवासाचे अंतर सुमारे 300 किमी वरून 22 किमी इतके कमी झाले आहे.
सुमारे 5 तासांची बचत
200 मीटर लांबीच्या सिसेरी नदी पुलामुळे पासीघाट आणि रोईंग यांच्यातील प्रवासाचा वेळ सुमारे 5 तासांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिबांग खोरे आणि सियांग यांच्यातील संपर्क अधिक मजबूत झाला आहे.
बोगदे : भूप्रदेश भेदत, तासांची बचत
भारताच्या काही अत्यंत अवघड भूप्रदेशांमधून बोगद्यांद्वारे सर्वात कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होत आहे. पर्वत, वळणावळणाचे रस्ते आणि धोकादायक मार्ग टाळून हे बोगदे प्रवासाचा वेळ कमी करत असून, प्रवास अधिक सुरळीत करत आहेत.

4–5 तासांची बचत
9.02 किमी लांबीचा हा बोगदा रोहतांग खिंडीला वळसा घालतो आणि मनाली ते सर्चू मार्गाचे अंतर 46 किमीने कमी करतो. त्यामुळे लाहौल-स्पितीला सर्व ऋतूंमध्ये संपर्क-सुविधा उपलब्ध झाली आहे.
जवळपास 2 तासांची बचत
9 किमी लांबीचा हा बोगदा अवघड भूप्रदेशाला वळसा घालतो, प्रवासाचे अंतर सुमारे 30 किमीने कमी करतो आणि जम्मू व श्रीनगरदरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास 2 तासांनी कमी करतो.
~1.5 तासांची बचत
8.45 किमी लांबीच्या या दुहेरी नलिका असलेल्या बोगद्यामुळे रस्त्याचे अंतर 16 किमीने कमी झाले असून, प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासाने कमी झाला आहे.
प्रवासाचा वेळ 1 तासापेक्षा अधिक कमी
सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला हा बोगदा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या तेजपूर ते तवांग मार्गावर सर्व ऋतूंमध्ये संपर्क सुविधा सुनिश्चित करतो.
द्रुतगती मार्ग आणि आर्थिक मार्गिका
कमी अंतराचे मार्ग, नियंत्रित प्रवेश आणि अधिक वेग यामुळे द्रुतगती मार्ग आंतरशहरी प्रवासाचा वेग बदलत आहेत. पूर्वी अनेक तास लागणारे लांब पल्ल्याचे प्रवास आता लक्षणीयरीत्या कमी वेळेत पूर्ण होत आहेत.
2.5 तास → 50 मिनिटे
82 किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे दिल्ली आणि मेरठदरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे अडीच तासांवरून 50 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.
3 तास → 75 मिनिटे
118 किमी लांबीच्या या द्रुतगती मार्गामुळे बेंगळुरू आणि म्हैसूरदरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास 3 तासांवरून सुमारे 75 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.
6 तास → 2.5 तास
213 किमी लांबीची नियंत्रित प्रवेश असलेली ही मार्गिका दिल्ली आणि डेहराडूनदरम्यानचा प्रवासाचा वेळ 6 तासांपेक्षा अधिकवरून सुमारे अडीच तासांपर्यंत कमी करते.
- मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग (डिसेंबर, 2022)
16 तास → 8 तास
701 किलोमीटर लांबीच्या प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्गामुळे मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला.
- अहमदाबाद – धोलेरा द्रूतगती महामार्ग
अहमदाबाद-धोलेरा: 100 किमी व 2 तास 15 मिनिटे → 83 किमी व 45 मिनिटे
अहमदाबाद ते भावनगर: 169 किमी व 3 तास 15 मिनिटे → 141 किमी व 1 तास 45 मिनिटे
१०९ किमी लांबीचा, प्रवेश-नियंत्रित 'ग्रीनफील्ड' द्रुतगती मार्ग अहमदाबाद आणि धोलेरा यांच्यात अति-वेगवान संपर्क उपलब्ध करून देतो.
- दिल्ली – अमृतसर – कटरा द्रूतगती महामार्ग (फेज 1 – जुलै, 2026)
दिल्ली – अमृतसर: 8 तास → 4 तास
दिल्ली – कटरा: 14 तास → 6 तास
श्री माता वैष्णो देवीकडे जाणारी भाविक आणि पर्यटकांची वर्दळ वाढवण्यासाठी, तसेच या मार्गिकेच्या लगत औद्योगिक व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी हा द्रुतगती मार्ग विकसित केला जात आहे.
- दिल्ली – मुंबई द्रूतगती महामार्ग
33 तास → 12 तास
दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ साधारण 33 तासांवरून सुमारे 12 तासांपर्यंत कमी करण्यासाठी हा 'ग्रीनफील्ड' द्रुतगती मार्ग विकसित केला जात आहे.

रेल्वे: वेगवान गाड्या, कमी वेळेत प्रवास
नवीन पिढीतील गाड्या आणि विशेष 'हाय-स्पीड कॉरिडॉर्स'मुळे रेल्वे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होत आहे. 2026 च्या रेल्वे वेळापत्रकात हा बदल दिसून येतो, ज्यामध्ये संपूर्ण नेटवर्कवरील 549 गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. यापैकी 20 गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत 60 मिनिटे किंवा त्याहून अधिक बचत झाली आहे. तसेच, 48 गाड्यांच्या वेळेत 31 ते 59 मिनिटांची, तर 105 गाड्यांच्या वेळेत 16 ते 30 मिनिटांची बचत झाली आहे. उर्वरित 376 गाड्यांचा वेग 5 ते 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे.
नव्या पिढीच्या रेल्वेगाड्या (New Generation Trains)
वंदे भारत एक्सप्रेस, नवी दिल्ली – वाराणसी (फेब्रुवारी. 2019)
पूर्वीच्या सेवांच्या तुलनेत 40-50% अधिक जलद
भारतातील पहिली वंदे भारत रेल्वे 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली–कानपूर–प्रयागराज–वाराणसी या मार्गावर सुरू करण्यात आली. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यानचा निर्धारित प्रवास वेळ सुमारे आठ तासांचा आहे, ज्यामुळे या मार्गावरील आधीच्या रेल्वे सेवांच्या तुलनेत हा प्रवास सुमारे 40 ते 50 टक्के वेगाने होतो.
वंदे भारत एक्सप्रेस, कटरा–श्रीनगर (जून, 2025)
2 ते 3 तास बचत
या रेल्वेमुळे कटरा ते श्रीनगर दरम्यानचा प्रवास सुमारे तीन तासांवर आला आहे. विस्तारित जम्मू–श्रीनगर सेवा आता हा प्रवास 4 तास 50 मिनिटांत पूर्ण करते.
वंदे भारत एक्सप्रेस, बनारस–खजुराहो (नोव्हेंबर, 2025)
सुमारे 2 तास 40 मिनिटे बचत
पूर्वी चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या तुलनेत ही रेल्वे सुमारे 2 तास 40 मिनिटे वाचवते.
वंदे भारत एक्सप्रेस, एर्नाकुलम–बंगळुरू (नोव्हेंबर, 2025)
2 तासांपेक्षा जास्त बचत
ही सेवा हा प्रवास 8 तास 40 मिनिटांत पूर्ण करते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा जास्त कमी होतो.
वंदे भारत एक्सप्रेस, लखनौ–सहारणपूर (नोव्हेंबर, 2025)
जवळपास 1 तास बचत
ही रेल्वे हा प्रवास अंदाजे 7 तास 45 मिनिटांत पूर्ण करते.
वंदे भारत स्लीपर, हावडा–गुवाहाटी (जानेवारी, 2026)
सुमारे 17 तास ते सुमारे 14 तास
भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सराईघाट एक्सप्रेसच्या तुलनेत जवळपास तीन तास वाचवते. यात सुमारे 823 प्रवाशांसाठी 16 वातानुकूलित (AC) डबे आहेत.
हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोअर्स
· मुंबई – अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोअर्स
रस्त्याने 8 ते 9 तास → सुमारे 1 तास 58 मिनिट
508 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडोअरचा ऑपरेटिंग वेग ताशी 320 किमी असेल आणि यादरम्यान 12 स्थानके असतील. यात ठाणे खाडीखालील सुमारे 7 किमी लांबीच्या भारताच्या पहिल्या समुद्रांतर्गत रेल्वे बोगद्याचा समावेश आहे. या मार्गावरील पहिली सेवा ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
· घोषित केलेले सात हाय-स्पीड रेल्वे (HSR) कॉरिडोअर्स
सुमारे 1 ते 4 तासांच्या अंतरावरील प्रमुख शहरे जोडणारे मार्ग.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषित केलेले हे कॉरिडोअर्स सुमारे 4,000 किलोमीटर पसरलेले असून, यासाठी अंदाजे 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
|
कॉरिडोअर्स
|
प्रवासाचा अंदाजित वेळ
|
|
दिल्ली – वाराणसी
|
~3 तास 50 मिनिटे
|
|
वाराणसी – पाटणा – सिलिगुडी
|
~2 तास 55 मिनिटे
|
|
चेन्नई – बंगळुरु
|
~1 तास 13 मिनिटे
|
|
बंगळुरु – हैदराबाद
|
~2 तास
|
|
चेन्नई – हैदराबाद
|
~2 तास 55 मिनिटे
|
|
मुंबई – पुणे
|
~48 मिनिटे
|
|
पुणे – हैदराबाद
|
~1 तास 55 मिनिटे
|
प्रवाशांचा आणि समुदायांचा वाचलेला मौल्यवान वेळ
भारताच्या वाहतूक जाळ्याचे झालेले रूपांतर, लोक आणि क्षेत्रांमधील परस्पर संबंधांचे स्वरूप बदलत आहे. पूल आणि बोगदे नवीन मार्ग खुले करत आहेत, तर द्रूतगती महामार्ग आणि आधुनिक रेल्वे सेवा लांब अंतराच्या प्रवासाची पुनर्व्याख्या करत आहेत. या सर्व उपक्रमांमुळे एकत्रितपणे गतिशीलता अधिक सुलभ होत असून प्रादेशिक संपर्क आणि प्रवेशाचा विस्तार होत आहे.
References
Ministry of Road Transport & Highways:
Ministry of Railways:
Prime Minister’s Office:
Press Information Bureau:
Ministry of Finance:
Ministry of Defence:
Government of Maharashtra:
Click to see pdf
* * *
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/वैभवी जोशी/दर्शना राणे
(तथ्य सामग्री आईडी: 151135)
आगंतुक पटल : 7
Provide suggestions / comments