जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

देशातील महत्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 2 टक्क्यांनी घट

प्रविष्टि तिथि: 13 APR 2018 2:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2018

 

देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 12 एप्रिल 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्याने घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये 40.857 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 25 टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील साठ्याच्या 84 टक्के इतका हा साठा आहे.

या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 8.69 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

राजस्थान, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, आंध्र प्रदेश-तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, पंजाब, झारखंड, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

 

NS/SM/PK

 


(रिलीज़ आईडी: 1528954) आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English