माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16 व्या मिफमध्ये ज्येष्ठ ॲनिमेटर व्ही. जी. सामंत, राम मोहन आणि भीमसेन खुराणा यांच्या ॲनिमेशन क्षेत्रातील कारकिर्दीवरील प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 01 FEB 2020 9:44PM by PIB Mumbai

मुंबई, 1 फेब्रुवारी 2020

 

भारतात ॲनिमेशनच्या कलेत मोलाचे योगदान असलेल्या तीन दिग्गज कलावंतांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या खास प्रदर्शनाचे आयोजन आज 16व्या मिफ मध्ये करण्यात आले. 

प्रख्यात ॲनिमेटर व्ही. जी. सामंत, राम मोहन आणि भीमसेन खुराणा यांना अनोखी आदरांजली या प्रदर्शनाच्या माध्यमातून वाहण्यात आली.  

ज्येष्ठ ॲनिमेटर व्ही. जी. सामंत, राम मोहन आणि भीमसेन खुराणा यांच्या ॲनिमेशन क्षेत्रातील कारकीर्दीवरील 'द टॉर्च बेअरर्स ऑफ इंडियन ॲनिमेशन' या  प्रदर्शनाचे उद्घाटन नेदरलँड्सचे सुप्रसिद्ध ॲनिमेटर मायकल ड्य्क डी वीट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिफच्या संचालिका स्मिता वत्स शर्मा, फिल्म डिव्हिजनचे माजी संचालक व्ही. एस कुंडू, ॲनिमेटर ई. सुरेश, ॲनिमेटर चेतन शर्मा, ध्वनी देसाई आदी उपस्थित होते.

प्रसिद्ध ॲनिमेटर चेतन शर्मा यांनी सुद्धा ॲनिमेशन क्षेत्रातील  या दिग्गज कलावंतांच्या कार्यातून आपल्याला कशी प्रेरणा मिळते, याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. ॲनिमेशन ही एक समाजला शिक्षित करणारी तसेच समाजाला प्रेरणा देणारी एक अद्भुत कला आहे, असे शर्मा म्हणाले.

यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या ॲनिमेशन कलेतून अनेक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरले असेही त्यांनी स्पस्ट केले.

या दिग्गज कलाकारांचे या क्षेत्रातील योगदान, आणि प्रवास उलगडून दाखवला. प्रेक्षकांना ॲनिमेशन बद्दल आकर्षण आहे त्यायमुळे ॲनिमेशन पंटांना प्रेक्षक वर्ग नाही ह्यात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक ॲनिमेशन पटांच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण होणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले

K.Shankar/S.Tupe/D.Rane

 



(Release ID: 1601619) Visitor Counter : 133