गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना पैशांचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी गृह मंत्रालयाने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना जारी केल्या मार्गदर्शक सूचना
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                02 APR 2020 6:14PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                
 
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020
 
वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागाने कोविड -19  विरुद्ध लढा देण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (पीएम-जीकेवाय) लाभार्थ्यांना बँकांमार्फत पैशांच्या वितरणासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून पंतप्रधान- गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना सुरळीतपणे पैसे वितरित करण्यासाठी  सामाजिक अंतर पाळण्याचे नियम लक्षात ठेवून सर्व आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हा अधिकारी आणि फील्ड एजन्सीच्या संबंधित विभागांना मार्गदर्शक सूचनांचे  काटेकोरपणे पालन करण्याविषयी सांगितले जाऊ शकते.
 राज्यांसाठीची मार्गदर्शक तत्वे पाहण्यासाठी कृपया इथे क्लीक करा.
 
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
 
                
                
                
                
                
                (Release ID: 1610391)
                Visitor Counter : 184