रेल्वे मंत्रालय
रेल्वेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी PPE कीट बनवण्याचे रेल्वेचे काम अत्यंत वेगाने सुरु
रेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती
जगधारीच्या कारखान्यात पहिल्या किट्सचे उत्पादन; सध्या 17 कारखान्यात निर्मिती सुरु
प्रविष्टि तिथि:
07 APR 2020 12:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वेने (personal Protection equipment) म्हणजेच वैयक्तिक संरक्षक किट्स बनवण्याचे काम मिशन मोडवर अत्यंत वेगाने सुरु केले आहे. डीआरडीओ ने मान्यता दिलेल्या जगधारीच्या कारखान्यात हे उत्पादन सुरु झाले आहे. आता विविध क्षेत्रात, मान्यताप्राप्त डिझाईन आणि सामान वापरुन या किट्स तयार केल्या जात आहे.रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये रेल्वेचे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी रुग्णालयात कोरोनाच्या हजारो रुग्णांवर उपचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही किट्स तयार केली जात आहेत.
सध्या रेल्वे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 किट्सचे उत्पादन केले जात आहे. एकूण 17 कारखान्यात ही किट्स बनवली जाणार आहेत.
यापैकी 50 टक्के PPE किट्स देशभरात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय यांनी पुरवली जाणार आहेत.
यासाठी लागणारे सर्व साहित्य पंजाबमधल्या जागाधारीच्या कारखान्यात बनवले जात आहे. या कारखान्याच्या आजूबाजूला अनेक कापड उद्योग असल्याने इथे सामान मिळणे सोपे आहे.
आगामी काळात, याचे उत्पादन अधिक वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. कोविडविरुध्द लढा देणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणांनी रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
सध्या तांत्रिक सहाय्य आणि सामान तयार असून अधिकाधिक उत्पादन लवकरच सुरु केले जाईल.
भारत सरकारने PPE किट्सची आवश्यकता गृहीत धरुन सुरु केलेल्या उत्पादनाच्या पलीकडे जात, रेल्वेने स्वतःहून हे अधिकचे उत्पादन सुरु केले आहे.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1611926)
आगंतुक पटल : 295
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam