कोळसा मंत्रालय
ऊर्जा आणि बिगर ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांना सीआयएलकडून दिलासा
प्रविष्टि तिथि:
09 APR 2020 12:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020
कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल )ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांना जवळपास 80 टक्के कोळसा पुरवत आहे. वर्ष 2020-21 या चालू वर्षात ऊर्जा क्षेत्राला 550 दशलक्ष टन कोळसा ऊर्जा क्षेत्राला देऊ करण्यात आला आहे. ऊर्जा क्षेत्राला दिलासा देण्यासाठी आणि कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी सीआयएलने इंधन पुरवठा करारांकरिता आगाऊ रोख पद्धतीने भरणा करण्याऐवजी यूझन्स लेटर ऑफ क्रेडिट सुविधेसाठी आधीच परवानगी दिली आहे.
एप्रिल 2020 या महिन्यात बिगर ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांसाठीही अशाच प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1612470)
आगंतुक पटल : 249