गृह मंत्रालय

कोविड-19 च्या विरोधात लढणाऱ्यांना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे पोलिस संरक्षण देण्याचे सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना गृह मंत्रालयाचे निर्देश

Posted On: 11 APR 2020 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

देशामध्ये काही ठिकाणी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाचा छळ केला जात असल्याच्या घटना सामोऱ्या आल्या आहेत. हे लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तसेच पोलिस अधिकारी वर्गाला काही निर्देश दिले आहेत.

जे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत, त्यांना रुग्णालयांमध्ये आणि तसेच कोविड-19 चे निदान झालेले रुग्ण जेथे आहे अथवा कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता आहे अशा संशयित, संभाव्य लोकांना जेथे अलग ठेवले जात आहे, अशा स्थानी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाला पुरेसे पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या विविध ठिकाणी लोकांच्या आरोग्य परीक्षणाचे, चाचणीचे काम केले जात आहे. अशा स्थानांवरही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वर्गाला आवश्यक पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

 

 

R.Tidke/S.Bedekar/P.Malandkar


(Release ID: 1613559)