गृह मंत्रालय
कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 3 मे 2020 पर्यंत असलेल्या प्रवासी निर्बंधामुळे सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांना वाणिज्य दूतावासाच्या सेवा देणार
प्रविष्टि तिथि:
17 APR 2020 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020
कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी निर्बंधामुळे सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांना वाणिज्य दूतावासाच्या सेवा 30th April, 2020 पर्यंत मोफत देणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने 28.03.2020 रोजी जाहीर केले होते.
(https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1613895)
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे आणि प्रवासबंदीचा विचार केल्यानंतर, सध्या भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना परदेशीय प्रादेशिक नोंदणी अधिकारी/परदेशी नोंदणी अधिका-यांच्या कार्यालयामार्फत या नागरिकांना वाणिज्य दूतावासाच्या सेवा पुरविण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड-19 महामारीच्या जागतिक प्रसारामुळे आणि भारतीय प्राधिकरणाने लावलेल्या प्रवासी निर्बंधांमुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना ज्यांचा नियमित व्हिसा, ई-व्हिसा किंवा वास्तव्याचा काळ संपला आहे किंवा 01.02.2020 च्या मध्यरात्रीपासून 03.05.2020 च्या मध्यरात्री पर्यंत संपणार आहे त्यांना ऑनलाईन अर्ज केल्यावर तो 03.05.2020 च्या मध्यरात्रीपर्यंत मोफत वाढवून मिळणार आहे.या कालावधीत त्यांच्याकडून विनंती केल्यास अशा परदेशी नागरिकांना 03.05.2020 नंतर 14 दिवसांपर्यंत म्हणजेच 17.05.2020 पर्यंत अतिरिक्त वास्तव्यासाठीचा दंड आकारला जाणार नाही.
भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना 03.05.2020 पर्यंत देण्यात येणाऱ्या वाणिज्य दूतावासाच्या सेवा जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1615545)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam