आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 0.2 मृत्यू, जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात हेच प्रमाण 4.1 मृत्यू इतके
आतापर्यंत 24 लाख नमुन्यांची चाचण्या पूर्ण
Posted On:
19 MAY 2020 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2020
सद्यस्थिती
गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 2,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे, आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39,174 इतकी झाली आहे. म्हणजेच, सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारतो आहे.
देशात सध्या कोविड-19 चे 58,802 सक्रीय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या एकूण रूग्णांपैकी सुमारे 2.9% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.
प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या 0.2 इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 4.1 मृत्यू इतके आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवाल क्रमांक 119 मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांची यादी खालीलप्रमाणे आहे.
देश
|
एकूण मृत्यू
|
प्रती लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण
|
जग
|
3,11,847
|
4.1
|
अमेरिका
|
87180
|
26.6
|
इंग्लंड
|
34636
|
52.1
|
इटली
|
31908
|
52.8
|
फ्रांस
|
28059
|
41.9
|
सेप्न
|
27650
|
59.2
|
ब्राझील
|
15633
|
7.5
|
बेल्जियम
|
9052
|
79.3
|
जर्मनी
|
7935
|
9.6
|
ईराण
|
6988
|
8.5
|
कॅनडा
|
5702
|
15.4
|
नेदरलँड्स
|
5680
|
33.0
|
मेक्सिको
|
5045
|
4.0
|
चीन
|
4645
|
0.3
|
तुर्कस्थान
|
4140
|
5.0
|
स्वीडन
|
3679
|
36.1
|
भारत
|
3163*
|
0.2
|
* 19th May, 2020 रोजीची ताजी आकडेवारी
एकूण संसर्गाच्या तुलनेत कमी असलेला मृत्यूदर, वेळेत रुग्ण ओळखून त्यांच्यावर झालेल्या योग्य उपचारांचे निदर्शक आहे.
चाचण्या
देशभरात काल विक्रमी 1,08,233 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण 24,25,742 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
भारतात जानेवारी महिन्यात कोविड-19 ची चाचणी केवळ एकाच प्रयोगशाळेत होत होती, आता मात्र आपण अत्यंत जलद गतीने आपल्या चाचणी क्षमतेत वाढ केली असून सध्या देशात 385 सरकारी तर 158 खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांची सुविधा आहे. सर्व केंद्रीय सरकारी प्रयोगशाळा, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी क्षेत्रे या सर्व ठिकाणची चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय, चाचण्यांना गती देण्यासाठी TrueNAT आणि CBNAAT या आणखी दोन चाचणी किट्स विकसित करण्यात आल्या आहेत.
एम्ससारख्या 14 अग्रणी वैद्यकीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील प्रयोगशाळांना पुरेशी जैव-सुरक्षा प्रमाणके आणि अधिस्वीकृती करण्यात मदत करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये चाचणीची साधने सतत उपलब्ध राहावीत यासाठी साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टीने, भारतीय टपाल आणि खाजगी संस्थांच्या मदतीने 15 डेपो विकसित करण्यात आले आहेत. आधी चाचण्यांची साधने आपण आयात करत होतो, आता मात्र अनेक भारतीय कंपन्यांना ही साधने बनविण्यासाठी पाठबळ दिले जात आहे, यामुळे चाचणीची पुरेशी साधने देशात उपलब्ध आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 च्या चाचण्यांसाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आधीच्या निकषांसोबतच, आता चाचणीचे धोरण अधिक व्यापक करण्यात आले असून त्यात प्रतिबंधन आणि प्रभाव कमी करण्याच्या कामात सहभागी असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रूग्णांपैकी किंवा ILI ची लक्षणे असलेल्या कोणालाही, तसेच, घरी परत गेलेल्या स्थलांतरीत मजुरांना आजारपणानंतर सात दिवसात ILI ची लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. आधी माहितीसाठी :-
https://www.mohfw.gov.in/pdf/Revisedtestingguidelines.pdf
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कार्यालयीन ठिकाणी एखादा संशयित कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर काय केले जावे, याच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे :-
https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesonpreventivemeasurestocontainspreadofCOVID19inworkplacesettings.pdf
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 च्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर दंतरोग तज्ञ यांच्यासाठी ही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कारण दंतरोग तज्ञ, त्यांचे सहायक आणि रुग्ण देखील ‘अति धोकादायक’ श्रेणीत येतात, या सूचना बघण्या साठी इथे क्लिक करा:--
https://www.mohfw.gov.in/pdf/DentalAdvisoryF.pdf
या मार्गदर्शक सूचनांमध्ये सर्वच (कर्मचारी आणि अभ्यागत) या सर्वांनीच कायमच पालन करण्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांचा उल्लेख आहे. जर एखादा रुग्ण आढळला तर काय काळजी घ्यायची याचीही माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण साखळी तोडण्यासाठी सामुदायिक जनजागृती आणि प्रतीबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free).
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625136)
Read this release in:
Urdu
,
Punjabi
,
Hindi
,
English
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam