आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन यांनी कर्नाटकातील बल्लारी येथील विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशलिटी ट्रॉमा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले
डॉ. हर्षवर्धन याप्रसंगी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी आरोग्य मंत्री सुषमा स्वराज यांचे स्मरण करत म्हणाले – “ज्या लोकांना सर्वात जास्त आनंद झाला असता आज तेच आपल्यासोबत नाहीत”
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2020 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासमवेत बल्लारी येथील विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील सुपर स्पेशलिटी ट्रॉमा केंद्राचे (एसएसटीएस) आज आभासी पद्धतीने लोकार्पण केले. त्यानंतर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी एक्स्प्रेस फीडर लाइन, आयसीयू कक्ष आणि 13 केएल लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकचे आणि कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी अत्याधुनिक सीटी स्कॅनचे उद्घाटन केले.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजने (पीएमएसवायवाय) अंतर्गत 150 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून एसएसटीसी उभारण्यात आले आहे. यात आपत्कालीन आणि ट्रॉमा (आघात), न्यूरो सर्जरी आणि ऑर्थोपेडिक्स हे विभाग आहेत. या नवीन ब्लॉकमध्ये 8 ऑपरेशन थिएटर (6 मॉड्यूलर), 200 सुपर स्पेशॅलिटी खाटा, 72 आयसीयू खाटा, 20 व्हेंटिलेटर आणि वर नमूद केल्याप्रमाणे अत्याधुनिक सीटी स्कॅन आणि डिजिटल एक्स-रे मशीन आहेत. 27 पीजी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता देखील या सुविधा केंद्रात आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2003 च्या स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करत डॉ हर्ष वर्धन म्हणाले, “स्वातंत्र्याच्या 56 वर्षानंतर भारतातील विद्यमान एका एम्स व्यतिरिक्त अजून 6 एम्स कार्यरत असतील हे वाजपेयीजींच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले. एम्स सारख्याच सेवा पुरविण्यासाठी आणखी 75 संस्थांची स्थापन केली जाईल याची त्यांनी कल्पना केली होती.” तत्कालीन आरोग्यमंत्री सुषमा स्वराज यांचे पीएमएसएसवाय योजनेतील आणि बालारीमध्ये त्यांनी दिलेल्या भरीव योगदाना बद्दल देखील मंत्री बोलले. “आजचा हा कार्यक्रम बघून त्यांना खूप आनंद झाला असता. जे लोकं सर्वात आनंदी झाले असते आज ते आपल्यासोबत नाहीत.” असे ते म्हणाले.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे वैयक्तिकरीत्या यात लक्ष दिले याबद्दलच्या आठवणींना डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी उजाळा देत सांगतिले की , “2019 मध्ये पीएसएसएसवायच्या तिसरा टप्पा जाहीर झाल्यानंतर लगेच बल्लारीला पुढील वर्षी त्याचे ट्रॉमा केंद्र मिळाले. आकांक्षी जिल्ह्यात 74 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे काम जोरात सुरू आहे.” कर्नाटक राज्यासाठी नवीन एम्स उभारण्याबाबत सक्रिय विचार सुरु असून चिक्कामागलूरू, हवेरी, यादगीर आणि चिक्काबल्लापूर या जिल्ह्यात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. राज्य सरकारतर्फे केंद्रीय वित्तपुरवठा व स्थानिक देखरेखीसह आतापर्यंत 157 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत.
31 डिसेंबर 2020 पर्यंत आयुष्मान भारत-आरोग्य व कल्याण केंद्रे कार्यान्वित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. “2025 मध्ये जागतिक मुदतीच्या 5 वर्षांपूर्वी देवी आणि पोलिओ सारख्या तसेच टीबीचे समूळ उच्चाटन करण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धते बद्दलही ते बोलले." “गोवर आणि रुबेलादेखील योग्य वेळी उच्चाटन केले जाईल,” ते पुढे म्हणाले. ते सरकारने सुरू केलेल्या ‘ईट राईट इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ चळवळींविषयी देखील बोलले.
M.Chopade /S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1650045)
आगंतुक पटल : 280