आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

12 राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक


भारतात प्रतिदिन 60 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याची सलग सहाव्या दिवशी नोंद

सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 2.1 दशलक्षाहून जास्त

Posted On: 02 SEP 2020 4:57PM by PIB Mumbai

 

भारताने आज रुग्ण बरे होण्याचा 29 लाखाचा (29,01,908) टप्पा पार केला.

या आधी 22 दिवसात 10 लाख रुग्ण बरे झाल्याची नोंद होती. त्या तुलनेत गेल्या केवळ 17 दिवसांत 10 लाख रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.

कोविड -19 च्या भारतातील व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे बरे होणाऱ्या रूग्णांचा वाढता दर. रुग्ण बरे होण्याचा निरंतर वाढणारा दर भारत कायम ठेवत असताना, बरे होणाऱ्यांची संख्या बरीच वाढली असून त्यांना रुग्णालयातून किंवा गृह विलगीकरणातून सोडण्यात आलेले आहे.

WhatsApp Image 2020-09-02 at 10.56.00 AM.jpeg

मे 2020 पासून, बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत 58 पट वाढ झाली आहे.

12 राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. एकूण बरे झालेल्यांपैकी सुमारे 30% हे केवळ महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यातील आहेत.

WhatsApp Image 2020-09-02 at 11.45.07 AM.jpeg

गेल्या काही महिन्यांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. भारतात प्रतिदिन 60 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याची सलग सहाव्या दिवशी नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 62,026 रुग्ण बरे झाले असून भारतात कोविड -19 रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण आणखी सुधारून 76.98% झाले आहे. हा आकडा सातत्याने प्रगती दर्शवित आहे.

WhatsApp Image 2020-09-02 at 11.58.37 AM.jpeg

रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या सक्रिय प्रकरणांपेक्षा 21 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दर आठवड्याला सरासरी 4 पटीने वाढले आहे.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in  यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in  and @CovidIndiaSeva  यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650737) Visitor Counter : 202