आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ताजी माहिती (अपडेट)
नवीन नोंद झालेले 76 टक्के कोविड रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील
प्रविष्टि तिथि:
21 SEP 2020 2:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2020
देशात, गेल्या 24 तासांत एकूण 86,961 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 76 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
यात एकट्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 20,000 पेक्षा जास्त आहे, तर आंध्रप्रदेशातील रूग्णांचा वाटा 8,000 पेक्षा जास्त आहे.

गेल्या 24 तासांत देशात 1,130 रुग्ण मृत्यूमुखी पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांपैकी 86 टक्के रुग्ण सर्वाधिक बाधित 10राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्रात 455 लोक मृत्यूमुखी पडल्याची नोंद झाली असून त्यानंतर कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथे अनुक्रमे 101 आणि 94 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

U.Ujgare/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1657217)
आगंतुक पटल : 269