पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

सरकार देशभरातल्या प्राणीसंग्रहालयांच्या सुधारणेची आणि विस्ताराची योजना ‘पीपीपी’ पद्धतीने राबविणार - प्रकाश जावडेकर

Posted On: 05 OCT 2020 5:30PM by PIB Mumbai

 

वन्यजीव सप्ताह 2020 निमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातल्या वैविध्यपूर्ण वन्यजीवनाबद्दन सर्वांचे अभिनंदन केले आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमधून (पीपीपी) देशातल्या 160 प्राणीसंग्रहालयांच्या श्रेणीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्यांचा विकास, विस्तार करण्याच्या योजनेवर सरकार काम करीत असल्याचे माहिती जावडेकर यांनी आज दिली. वन्यजीवन आणि मानव यांच्यामध्ये अधिक संवाद निर्माण होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि वन्यजीवांचे अधिक बारकाईने निरीक्षण करून, त्यांना समजून घेऊन , त्यांच्या वर्तनाची माहिती जाणून घेण्यासाठी या योजनेमुळे मदत होणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

DSC_1801.jpg

देशातल्या सर्व प्राणीसंग्रहालयांच्या दर्जामध्ये सुधारणा करून विकास करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये याविषयी विचार करण्यात येईल, असे सांगून पर्यावरण मंत्री जावडेकर म्हणाले, राज्य सरकारे, नगरपालिका, व्यावसायिक आणि लोक-नागरिक असे या योजनेचे प्रमुख घटक असणार आहेत. आपले प्राणीसंग्रहालये उत्तम झाली तर त्यांना भेट देणारे- विशेषतः विद्यार्थी आणि मुले तसेच भावी पिढी निसर्गाशी जोडली जातील, त्यांना वन्यजीवांची चांगली माहिती होईल. प्राणीसंग्रहालयाला भेट देणे, त्यांच्यासाठी उत्तम अनुभव ठरेल. निसर्ग आणि मानव यांच्यात जवळीचे नाते निर्माण होण्यास मदत होईल.

हम अपने चिड़ियाघरों को और बेहतर ढंग से विकसित करने एवं वन्यजीवो के संरक्षण में जनता की भागीदारी को बढ़ावा देने की दिशा में प्रयास करेंगे। चिड़ियाघरों के विकास से ही वन्यजीवों एवं मनुष्य में तालमेल सुनिश्चित किया जा सकता है।@moefcc @CZA_Delhi @DDNewslive @PIB_India pic.twitter.com/HKuXdmFoeK

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) October 5, 2020

याप्रसंगी जावडेकर यांनी CZA-TERI यांनी तयार केलेला एक अहवाल प्रसिद्ध केला. ‘‘परिसंस्था सेवेचे आर्थिक मूल्यांकन, राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान, नवी दिल्ली’’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. यामध्ये मानवासाठी प्राणीसंग्रहालयासारख्या वसाहतींचे महत्व किती आणि कसे आहे, हे अधोरेखित केले असून, भारतभरामध्ये अनेक प्राणीसंग्रहालये तयार करण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला आहे.

भारतामध्ये कदाचित संपूर्ण जगामध्येच अशा प्रकारचा अभ्यास पहिल्यांदाच झाला आहे. परिसंस्था सेवेचे सुमारे 2019-20 मध्ये सुमारे 423 कोटींचे मूल्य (यामध्ये जैवविविधतेचे संवर्धन, रोजगार निर्मिती, कार्बन जप्ती, शिक्षण आणि संशोधन, नवनिर्मिती आणि सांस्कृतिक) आहे. यामध्ये काही घटकांचे मूल्य अंदाजे 55,000 कोटी आह . (ई-अहवाल)

मंत्री जावडेकर यांनी यावेळी पिंज-यांमध्ये बंद असलेल्या प्राण्यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणा-या प्राणीसंग्रहालया अधिकारी आणि कर्मचा-यांना यावेळी CZA-प्राणी मित्र प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले. चार गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सर्वोत्तम काम करणारे संचालक, सर्वोत्तम पशुवैद्यक, सर्वोत्तम जीवशास्त्रज्ञ/ शिक्षणतज्ज्ञ, आणि सर्वोत्तम पशुपालक. यांचा सन्मान करण्यात आला.

Meet the Prani Mitra Awardees of this year, who have shown exemplary determination in their duty and compassion towards zoo animals.

Congratulations, people like you keep the wheels of our Zoos running smoothly, even through difficult times.#wildlifeweek2020 pic.twitter.com/QSL4SXxTzP

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) October 5, 2020

यावेळी आभासी चर्चात्मक संवादाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये मंत्री जावडेकर यांनी देशभरातल्या शालेय मुलांशी संवाद साधला आणि आपल्या देशातल्या वन्यजीवांचे संवर्धन करणे, रक्षण करणे किती गरजेचे आहे, मानवी जीवन आणि वन्यजीवन यांच्यात समतोल राखण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

देशातल्या प्राणीसंग्रहालयांच्या कारभारावर देखरेख ठेवणे आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी रणनितीला पूरक स्थितीच्या पूर्ततेसाठी सीझेडए ही संस्था स्थापण्यात आली होती. प्राण्यांचा अधिवास आणि कल्याण यांच्यासाठी तसेच देशातली सुमारे 160 प्राणीसंग्रहलये तसेच प्राणी बचाव केंद्रांमध्ये जागतिक स्तरावर मान्यता असलेल्या पद्धतीने कार्य केले जात आहे. भारतीय प्राणीसंग्रहालयांमध्ये एकूण जवळपास 56,481 पेक्षा जास्त प्राणी आहेत. त्यामध्ये 567 प्रजातींचा आणि धोक्यात आलेल्या 114 प्रजातींचाही समावेश आहे.

DSC_1786.jpg

वन विभागाचे महा संचालक आणि वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे विशेष सचिव डॉ. संजय कुमार, वन्यजीव अतिरिक्त महासंचालक सौमित्र दासगुप्ता, व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त महा संचालक डॉ. एस पी यादव, सीझेडएचे सदस्य सचिव, आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

-----

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661765) Visitor Counter : 226