अर्थ मंत्रालय

सोव्हरियन सुवर्ण रोखे योजना 2020-21 (मालिका सहावी)- विक्री मूल्य

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2020 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020


भारत सरकारने अधिसूचना क्रमांक 4(4)- बी (डब्ल्यू अँड एम) दि. 9 ऑक्टोबर, 2020 रोजी जाहीर केली आहे. यानुसार सोव्हरियन सुवर्ण रोखे योजना 2020-21 (मालिका सहावी) ची विक्री दि. 12 ते 16 ऑक्टोबर, 2020 पर्यंत खुली करण्यात येणार आहे. या विक्रीचा हिशेब दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी पूर्ण होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या रोख्यांचे मूल्य खरेदीच्या कालावधीमध्ये प्रति ग्रॅम 5,051 (पाच हजार एक्कावन्न रूपये फक्त) असणार आहे. 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून डिजिटल माध्यमाने पैसे भरणा-या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने निर्गम किंमतीवर प्रतिग्रॅम 50 रूपयांची (पन्नास रुपये फक्त) सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ऑनलाइन पद्धतीने सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी रोख्यांचे मूल्य प्रति ग्रॅम 5,001 रुपये (पाच हजार एक रुपये फक्त) असणार आहे. 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1663289) आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil