भारतीय स्पर्धा आयोग

पीजी एस्मराल्डाला इकॉममधल्या भागभांडवल अधिग्रहणासाठी सीसीआयकडून मंजुरी

Posted On: 12 JAN 2021 12:38PM by PIB Mumbai

 

सीसीआय, भारतीय स्पर्धात्मकता आयोगाने इकॉममधल्या भागभांडवल अधिग्रहणासाठी पीजी एस्मराल्डाला मंजुरी दिली आहे.

इकॉम एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड मधले भाग भांडवल पीजी एस्मराल्डा अधिग्रहीत करणार आहे.

पीजी एस्मराल्डा ही गुंतवणूक आस्थापनाद्वारे नियंत्रित केली जाते आणि हे आस्थापन पार्टनर ग्रुप एजी किंवा त्याच्याशी संलग्न पार्टनर्स ग्रुप कडून नियंत्रित केले जाते. पार्टनर ग्रुप जागतिक खाजगी बाजार गुंतवणूक व्यवस्थापक असून त्याचे मुख्यालय स्विझर्लंडला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संलग्न सेवा, आरोग्य सेवा, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी उत्पादने, बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवा अशा विविध कंपन्यांमध्ये ती गुंतवणूक करते. 

इकॉम ही भारतातली कंपनी असून ती भारतात थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा पुरवण्याचे काम करते.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687863) Visitor Counter : 149