माहिती आणि प्रसारण मंत्रालय

'विंडो बॉय वुड आँल्सो लाईक टू हॅव सबमरीन', म्हणजे  आपल्या सभोवताली जे आहे त्या शिवाय दुसरे काहीच नसते,हे समजल्यानंतर येणाऱ्या निराशाजनक पण मुक्त करणाऱ्या भावनेबद्दल आहे:दिग्दर्शक अँलेक्स पिपेर्नो

Posted On: 18 JAN 2021 5:31PM by PIB Mumbai

 

मी ऊरूग्वे ते अर्जेंटिना फेरी बोटीतून जात असताना माझ्या लक्षात आले, की आपण दोन समांतर आयुष्ये जगत आहोत आणि ही बोट ही अशी विस्मयकारक बोट आहे, जी अशा समांतर आयुष्यांना जोडू शकते. त्यामुळे माझ्या हेसुद्धा लक्षात आले, की यामुळे दोन समांतर आयुष्ये देखील जोडली जाऊ शकतात. ही संकल्पना माझ्या मनात दहा वर्षे घोळत होती.अशाप्रकारे ऊरुग्वे येथील दिग्दर्शक अँलेक्स पिपेर्नो यांनी आपला चित्रपट 'विंडो बॉय वुड आँल्सो लाईक टू हॅव सबमरीन ',ज्याचे पहिले भारतातील प्रदर्शन इफ्फीच्या मंचावर काल दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी झालेयांनी आपल्या चित्रपटाचे वर्णन केले. ते त्यांचे सहनिर्माते अँराक्वेन राॅड्रीगेज यांच्यासह गोव्यातील 51 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात, तिसऱ्या दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.

या चित्रपटात, वरवर पाहता एकमेकांशी संबंध नसलेल्या विलक्षण जागा आणि प्रसंगांतून विस्मयकारक गोष्टींचे सौंदर्यपूर्ण आणि गूढरम्य चित्रण केले आहे.

दिग्दर्शकांनी स्पष्ट केले,"  एखाद्या व्यक्तीला दुसरीकडे रहाताना अचानक गाठ पडणाऱ्या आणि चमत्क्रुतीपूर्ण गोष्टींबाबत हा चित्रपट आहे.तुम्हाला एखादा दरवाजा दिसला, तुम्ही तो उघडून बाहेर आलात आणि गेलात की तुम्हाला कळेल की पलीकडे काहीच नाही. म्हणजेच जे आपल्या सभोवताली आहे, ते आपल्या शिवाय दुसरे कुणीच नसते, हे समजल्यानंतर येणाऱ्या निराशाजनक पण मुक्त करणाऱ्या भावनेबद्दल आहे."

ऊरूग्वियन चित्रपटांबाबत बोलताना ते म्हणाले,"त्यात  विविध प्रकारच्या चित्रपटांचे मिश्रण आहे.माझा असा विश्वास आहे की राष्ट्रीय चित्रपट एखादाच नसावा, तर अनेक चित्रपट राष्ट्रीय असावेत." ते आशावादी होते आणि नजीकच्या काळात भारतात एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पिपेर्नो म्हणाले, की आपल्याच चित्रपटात परदेशी झाल्याचा अनुभव त्यांच्यासाठी चांगला होता."माझ्या स्वतःचा चित्रपट माझ्यासाठी परदेशी असणे, मजेशीर आहे."

जेव्हा त्यांना विचारले गेले, की त्यांना चित्रपट तयार करण्यासाठी चालना कशी मिळते, त्यावेळी ते म्हणाले "मी निरनिराळ्या संकल्पना आणि प्रतिमा जमा करत रहातो,आणि ज्याक्षणी त्या कारण न समजता एकत्र करू शकतो, त्यावेळी खरोखरच एक प्रेक्षक म्हणून मी त्या प्रक्रियेतून आनंद घेतो."

चित्रपटाचे सह-निर्माते अराक्वेन राँड्रिग्ज म्हणाले,की दोन वर्षांच्या कालावधीत चार निरनिराळ्या देशांत दोन खंडांमध्ये चित्रपटाचे चित्रिकरण करणे खरोखरच एक आव्हान होते. आणि आता आम्ही इफ्फीमधे आलो आहोत, हे खूपच अर्थपूर्ण आहे आणि मोठे यश मिळाल्यासारखे वाटते.

'विंडो बाय वुड आँल्सो लाईक टू हॅव सबमरीन' एका तरुण खलाशाने समुद्रात समुद्रपर्यटन करताना माँटेव्हिडिओ येथील अद्भुतरम्य घराकडे जाणारा दरवाजा शोधून काढला या विषयी आहे. त्या मुलाने आशियातील शेतकऱ्यांच्या समूहाला सामोरे जात खोऱ्यातील वाळीत टाकलेले घर सापडते ज्यातून त्याला पारलौकिक सामर्थ्य प्राप्त होते.

 

M.Iyengar/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1689702) Visitor Counter : 21