पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला यशस्वी प्रारंभ केल्याबद्दल शेजारी राष्ट्रांच्या नेत्यांकडून पंतप्रधान आणि भारत सरकारचे अभिनंदन

Posted On: 18 JAN 2021 6:22PM by PIB Mumbai

 

भारताने कोविड -19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला दि. 16 जानेवारी, 2021 रोजी यशस्वी प्रारंभ केल्याबद्दल शेजारी राष्ट्रांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे अभिनंदन केले आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी व्टिटर या समाज माध्यमाव्दारे म्हटले आहे की, ‘‘कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरू केल्याबद्दल आणि त्यांनी शेजारी मित्रराष्ट्रांविषयी दाखवलेल्या औदार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!''

My heartiest congratulations to Prime Minister Shri @narendramodi on the successful roll out of the #COVID19 vaccine & his generosity towards friendly neighbouring countries. #COVID19Vaccination #india #SriLanka pic.twitter.com/ToscTxwge6

— Gotabaya Rajapaksa (@GotabayaR) January 17, 2021

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी एका व्टिटमध्ये म्हटले आहे की, ‘‘कोविड-19 विरोधात लसीकरण मोहिमेव्दारे नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या विनाशकारी महामारीचा आता अंत होण्यास प्रारंभ झाला आहे, हे आपण पहात आहोत.’’

Congratulations PM @narendramodi and the Government of India on taking this very important step with this massive #COVID19Vaccination drive. We are starting to see the beginning of the end to this devastating pandemic. @IndiainSL https://t.co/fcx8bO7RfV

— Mahinda Rajapaksa (@PresRajapaksa) January 16, 2021

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमेद सोलिह यांनी एका व्टिटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ कोविड-19 पासून भारतीयांच्या संरक्षणासाठी लसीकरणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे अभिनंदन. या प्रयत्नामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होणारया बद्दल मला विश्वास आहे आणि अखेर आपण कोविड-19 चे संकट संपुष्टात आल्याचेही पाहणार आहोत.’’

Congratulations to PM @narendramodi and the Indian government for its landmark program to vaccinate India’s population against COVID-19. I’m highly confident that you’ll be successful in this endeavor and that we are finally seeing an end to the COVID-19 scourge.

— Ibrahim Mohamed Solih (@ibusolih) January 17, 2021

भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी व्टिट केले आहे की, ‘‘भारतामध्ये कोविड-19 विरोधात लसीकरण मोहीम आज सुरू होत आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे मी अभिनंदन करू इच्छितो. अनेक प्रश्न निर्माण करणा-या महामारीचा विनाश करण्यासाठी योग्य उत्तर आता आपल्याला मिळाले आहे, अशी आशा करतो.’’

I would like to congratulate PM @narendramodi and the people of India for the landmark launch of nationwide COVID-19 vaccination drive today. We hope it comes as an answer to pacify all the sufferings we have endured this pandemic. https://t.co/f921VupuJn pic.twitter.com/M9q3KKLFo3

— PM Bhutan (@PMBhutan) January 16, 2021

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689733) Visitor Counter : 214