अर्थ मंत्रालय

जीएसटी महसुलाची तूट भरून काढण्यासाठी राज्यांना दिलेली नुकसानभरपाई 1.04  लाख कोटींवर पोहोचली


सोमवार,1 मार्च, 2021 रोजी 4,000 कोटी रुपयांचा 18 वा हप्ता राज्यांना जारी

Posted On: 01 MAR 2021 7:08PM by PIB Mumbai

 

जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्याच्या दृष्टीने नुकसानभरपाईपोटी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने 4,000 कोटी रुपयांचा 18 वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला. या एकूण रकमेपैकी 3,677.74 कोटी रुपये 23 राज्यांना आणि जीएसटी परिषदेचे सदस्य विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशांना (दिल्ली , जम्मू आणि काश्मीर आणि पुदुच्चेरी) 322.26 कोटी रुपये जारी केले. अरुणाचल प्रदेश, मणिपूर , मिझोराम, नागालँड, आणि सिक्कीम या उर्वरित 5 राज्यांची जीएसटी अंमलबजावणीनंतर महसूलात तूट नाही.

आतापर्यंत जीएसटी महसूलाची तूट  भरून काढण्यासाठी नुकसानभरपाईच्या एकूण अंदाजापैकी 94 टक्के भरपाई राज्ये आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना जारी केली आहे. यापैकी , 95,138.08 कोटी रुपये राज्यांना आणि विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित  प्रदेशांना  8,861.92 कोटी रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे.

जीएसटी अंमलबजावणीमुळे महसुलातली 1.10 लाख कोटी रुपयांची अंदाजित तूट भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये, विशेष कर्ज खिडकी योजना सुरु केली.या खिडकीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीने भारत सरकारकडून कर्ज काढण्यात येत आहे. 23 ऑक्टोबर, 2020 पासून आतापर्यंत कर्ज घेण्याच्या 18 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

जीएसडीपीच्या 0.50% नुसार अतिरिक्त कर्जाची परवानगी असून विशेष कर्ज खिडकी द्वारे उभारण्यात आलेली आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांना 01.03.2021 पर्यंत जारी करण्यात आलेली राज्यनिहाय रक्कम

 

S. No.

Name of State / UT

Additional borrowing of 0.50 percent allowed to States

Amount of fund raised through special window passed on to the States/ UTs

1

Andhra Pradesh

5051

2306.59

2

Arunachal Pradesh*

143

0.00

3

Assam

1869

992.12

4

Bihar

3231

3897.50

5

Chhattisgarh

1792

2256.59

6

Goa

446

838.38

7

Gujarat 

8704

9204.31

8

Haryana

4293

4343.62

9

Himachal Pradesh 

877

1713.71

10

Jharkhand

1765

1225.90

11

Karnataka

9018

12383.13

12

Kerala

4,522

4513.40

13

Madhya Pradesh

4746

4533.28

14

Maharashtra

15394

11954.02

15

Manipur*

151

0.00

16

Meghalaya

194

111.80

17

Mizoram*

132

0.00

18

Nagaland*

157

0.00

19

Odisha

2858

3814.67

20

Punjab

3033

6542.97

21

Rajasthan

5462

4248.81

22

Sikkim*

156

0.00

23

Tamil Nadu

9627

6229.05

24

Telangana

5017

2027.33

25

Tripura

297

225.54

26

Uttar Pradesh

9703

5995.48

27

Uttarakhand

1405

2311.55

28

West Bengal

6787

3468.33

 

Total (A):

106830

95138.08

1

Delhi

Not applicable

5853.76

2

Jammu & Kashmir

Not applicable

2267.62

3

Puducherry

Not applicable

740.54

 

Total (B):

Not applicable

8861.92

 

Grand Total (A+B)

106830

104000.00

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701754) Visitor Counter : 235