रेल्वे मंत्रालय

कोटद्वार-दिल्ली जंक्शन-कोटद्वार सिद्धबाली जन शताब्दी एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 03 MAR 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021

 

केंद्रीय रेल्वेमंत्री, वाणिज्य, उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी कोटद्वार-दिल्ली जंक्शन-कोटद्वार सिद्धबाली जन शताब्दी विशेष रेल्वेगाडीला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक आणि इतर मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते.

औषध, कोळसा व इतर आवश्यक वस्तू पुरवून महामारी दरम्यान देशाची सेवा करणाऱ्या कष्टकरी रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती माननीय मंत्री पियुष गोयल यांनी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की कोटद्वार-दिल्ली मार्गाचे विद्युतीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे, केवळ 15 कि.मी.पर्यंतचे काम बाकी आहे जे या महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवरील गाड्या कोटद्वार ते दिल्लीपर्यंत धावतील. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. यानंतर संपूर्ण उत्तराखंडमध्ये सर्व गाड्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावतील. यामुळे राज्यात शून्य कार्बन उत्सर्जन होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित होईल.

 

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702315)
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi