सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांगजन  आणि जेष्ठ नागरीकांना साधने आणि सहाय्यक उपकरणे वाटपाच्या  शिबीराचे उद्या ईटानगर येथे आयोजन

Posted On: 04 MAR 2021 5:17PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात दिव्यांगजन आणि जेष्ठ नागरीकांना अखंडितपणे कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष योजना हाती घेतल्या आहेत.या उपक्रमाअंतर्गत कोविड-19 संबंधित सरकारने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत उद्या ईटानगर येथे दिव्यांगजनांना वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत सूचित झालेल्या दिव्यांगजन आणि जेष्ठ नागरीकांना भारत सरकारच्या  राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे डी.के.कन्व्हेंशन सभागृह, ईटानगर येथे सहाय्यक साधने आणि मदतशील उपकरणे वाटपाच्या  शिबीराचे उदघाटनपर आयोजन करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल निवृत्त  ब्रिगेडिअर डॉ. बी.डी.मिश्रा, सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री श्री. रतन लाल कटारिया यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उदघाटन करतील. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पूर्वी सूचित केलेल्या 217 पैकी 100 लाभार्थ्यांना सहाय्यक साधने आणि मदतशील उपकरणे वाटप करण्यात येईल.

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या (MoSJE) दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाअंतर्गत (DEPwD) कानपूर येथील भारतीय कृत्रिम अवयव निर्माण केंद्र( ALIMCO)यांच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

****

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702474) Visitor Counter : 140