उपराष्ट्रपती कार्यालय
ग्रामीण भागामध्ये परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी क्षेत्राने सरकारशी भागीदारी करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
उपराष्ट्रपतींनी केले तिरुपती येथील अमारा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन
Posted On:
04 MAR 2021 5:45PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती, एम. वेंकैया नायडू यांनी आज शहर आणि ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या तफावतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ग्रामीण भागामध्ये परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक आरोग्य निदान व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी क्षेत्राने सरकारशी भागीदारी करण्याचे आवाहन केले.
ही तफावत भरून काढण्याची तातडीची गरज आहे जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांनाही त्यांच्या खेड्यात आधुनिक आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळू शकेल असे ते म्हणाले. वैद्यकीय सुविधे अभावी आपल्या खेड्यातील कोणालाही झळ पोहोचू नये असे मत प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.
तिरुपती येथील अमारा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना उपराष्ट्रपतींनी सर्व पात्र नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहनही केले. या संधीचा उपयोग करून सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करुन कोविड -19 विरूद्धच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन पुन्हा एकदा करतो असे ते म्हणाले.
अलीकडेच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 2,23,846 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केल्याबद्दल कौतुक करताना ते म्हणाले की, या निर्णयामुळे आपल्या देशातील आरोग्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यास जोरदार चालना मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्यावरील खर्च कमी होईल याची शाश्वती वाटते.
नायडू यांनी आयुष्मान भारतसारख्या आरोग्य योजनांबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन केले जेणेकरुन वंचितांनी त्याचा लाभ घ्यावा.
सध्याच्या सर्वात आव्हानात्मक काळात डॉक्टर, निम वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी आणि आशा कर्मचार्यांसहित सर्व आरोग्य सेवा क्षेत्राशी निगडित व्यक्तींच्या निःस्वार्थी सेवा आणि त्यागासाठी राष्ट्र नेहमीच आभारी राहील अशी कृतज्ञता उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी क्लिक करा
****
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702488)
Visitor Counter : 223