संरक्षण मंत्रालय
आर्थिक वर्ष 20-21 साठी केंद्र सरकारला गोवा शिपयार्ड लिमिटेड कडून 22.30 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश प्रदान
Posted On:
04 MAR 2021 6:15PM by PIB Mumbai

गोवा शिपयार्ड लिमिटेडने आर्थिक वर्ष 20-21 साठी केंद्र सरकारला 22.30 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांशाचा धनादेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे 3 मार्च 2021 रोजी सुपूर्द केला. गोवा शिपयार्ड लिमिटेड च्यावतीने कमांडर बी. बी. नागपाल आयएन (निवृत्त) सीएमडी जीएसएल यांनी हा धनादेश सिंह यांना सुपूर्द केला. संरक्षण उत्पादन सचिव, राज कुमार आणि अतिरिक्त सचिव संजय जाजू देखील यावेळी उपस्थित होते. कंपनीच्या संचालक मंडळाने 17 डिसेंबर 2020 रोजी पाच रुपये किमतीच्या प्रत्येक समभागासाठी 3.75 रुपये इतका अंतरिम लाभांश जाहीर केला जो कंपनीच्या रोख भागभांडवलाच्या 75% इतका आहे. भागधारकांना हा लाभांश जानेवारी 2021 मध्ये यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे. गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी बी नागपाल म्हणाले की “आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड कठोर परिश्रम करीत आहे. या कामगिरीबद्दल गोवा शिपयार्ड आमचे ग्राहकांचे आणि सरकारचे आभारी आहे. ”
***
Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702503)
Visitor Counter : 211