दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

डाक अदालत

Posted On: 10 MAR 2021 4:08PM by PIB Mumbai

 

डाक सेवेबाबत आपली तक्रार सहा आठवडयापेक्षा जास्त काळ अनुत्तरित असल्यास सदर तक्रारीचे निवारण शीघ्र होण्यासाठी आपण डाक अदालत मध्ये दाद मागू शकता , ह्याकरीता आपण खालील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात व पूर्तता करावी.

 

  • ) डाक अदालत मध्ये फक्त ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यामधे झाले नाही अश्याच तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

२) आपले ई मेल /पत्र डॉ वि. ए. गुल्हाने वरिष्ठ अधीक्षक डाकघर , नागपूर शहर विभाग , नागपूर ४४०००१ यांच्या नावावर ई मेल द्वारा पाठवावित किवा प्रत्यक्ष संबंधित अधिकारी यांचेकडे दिलेल्या तारखेपर्यंत आणून दयावी. ई मैल आय डी donagpurcity.mh@indiapost.gov.in

३) प्रत्येक अर्जासोबत एकच तक्रार असावी .

४) तक्रारिमध्ये तक्रार करणार्‍यांनी स्वताचे नाव व पत्ता तसेच फोन नंबर आणि प्रारंभी केलेल्या तक्रारि बद्दल ज्या अधिकार्‍याकडे त्त्यांनी तक्रार नोंदीवली असेल त्यांचे नाव व हुद्दा तसेच तक्रारीचे तारीख सोबत मूल तक्रारीचे नक्कल प्रत आणि त्या पत्र व्यवव्हारची प्रत पाठवावी॰

 

) आपला अर्ज वरील उल्लेख केलेल्या कागद पत्रासोबत संबधित अधिकारी यांच्याकडे १८.०३.२०२१.पर्यंत किवा त्या अगोदर पाठवावित. त्यानंतर आलेल्या तक्रारीची नोंद ह्या डाक अदालत मध्ये केली जाणार नाही.

 

६) डाक अदालत २५.०३.२०२१ ला १६-00, वाजता नागपूर शहर विभाग , नागपूर -४४०००१ यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे.

( तक्रार कर्त्यानी स्वताच्या खर्चानी वरील ठिकाणी वेळेवर हजर रहावे.

 

 

 

(डॉ वि ए गुल्हाने)

वरिष्ठ अधीक्षक डाकघर,

नागपूर शहर विभाग, नागपूर -४४०००१

 

PIB Nagpur/PK



(Release ID: 1703782) Visitor Counter : 106


Read this release in: English