श्रम आणि रोजगार मंत्रालय

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती

Posted On: 10 MAR 2021 4:54PM by PIB Mumbai

 

उद्योजकांना नवीन रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांना औपचारिक कामगार म्हणून काम मिळावे या उद्देशाने सरकार २०१६ पासून पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना (पीएमआरपीवाय) राबवत आहे.  या योजनेंतर्गत, भारत सरकार  कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (ईपीएस) यासाठी नियोक्त्यांचे पूर्ण योगदान तीन वर्षांच्या कालावधीसाठी (वेळोवेळी मान्य असणारे) देय रक्कम देणार आहे. हे  योगदान बारा टक्के आहे.   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) या नव्या कर्मचाऱ्यांची नोंद झाली असली पाहिजे. लाभार्थ्यांच्या नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च 2019 होती. 31 मार्च 2019 पर्यंत नोंदणीकृत लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत नोंदणीच्या तारखेपासून 3 वर्षांचा लाभ मिळणार आहे.  3 मार्च 2021 पर्यंत 1.52 लाख आस्थापनांमधून 1.21 कोटी लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आला आहे.

नवीन रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑक्टोबर 2020 पासून आत्मनिर्भर-भारत रोजगार योजना (एबीआरवाय) लागू करण्यात आली आहे. कोविड १९ महामारीच्या काळात अनेकांच्या रोजगावर परिणाम झाला ती परिस्थीती सावरणे, सामाजिक सुरक्षा लाभ कामगारांपर्यंत पोहचवणे आणि नव्याने रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. एबीआरवाय अंतर्गत, भारत सरकार दोन वर्षांच्या कालावधीसाठी, दोघांचाही म्हणजे कर्मचार्‍यांचा वाटा (वेतनाच्या १२%) आणि नियोक्तांचा वाटा (वेतनाच्या १२%) देय वा फक्त कर्मचार्‍यांचा वाटा जो रोजगाराच्या क्षमतेवर अवलंबून असतो तो देईल.  ईपीएफओमधे ही आस्थापने  नोंदणीकृत असल्याने त्या माहितीच्या आधारे कार्यवाही केली जाईल.

याशिवाय, सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरू केली.ज्या आस्थापनांमधे कर्मचाऱ्यांची संख्या १०० पर्यंत आहे आणि त्यातल्या ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन १५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहे अशांसाठी या योजनेअंतर्गत भारत सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) अंतर्गत कर्मचार्‍यांचा १२% हिस्सा आणि १२% नियोक्त्यांचा वाटा असा एकूण २४% वाटा मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सरकार देणार आहे.

कामगार व रोजगार राज्यमंत्री राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

Jaydevi PS/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703818) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Bengali