अर्थ मंत्रालय

महसुली तुट अनुदानापोटी 14 राज्यांना 6,194.09  कोटी रुपये जारी


चालू वित्तीय वर्षात एकूण 74,340 कोटी रुपयांचे महसुली तुट अनुदान राज्यांना जारी

Posted On: 10 MAR 2021 6:18PM by PIB Mumbai

 

वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज महसुली तुटीच्या भरपाईसाठी 12 वा आणि अंतिम मासिक हप्ता म्हणून पोस्ट डिव्होल्युशन रेव्हिन्यू डेफिसिट (पीडीआरडी) अनुदानाअंतर्गत  राज्यांना 6,194.09 कोटी रुपये जारी केले. हा हप्ता जारी केल्याने चालू वित्तीय वर्षात पात्र  राज्यांना एकूण 74,340 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.

राज्यनिहाय जारी करण्यात आलेले अनुदान आणि 2020-21 मध्ये राज्यांना जारी करण्यात आलेले पोस्ट डिव्होल्युशन महसुली तुट अनुदानाचे विस्तृत विवरण परिशिष्टात दिले आहे.

राज्य घटनेच्या कलम 275 अंतर्गत राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन रेव्हिन्यू डेफिसिट अनुदान देण्यात येते. राज्यांची महसुली तुट भरून काढण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार मासिक हप्त्यात हे अनुदान जारी केले जाते. आयोगाने 14 राज्यांसाठी अशा अनुदानाची शिफारस केली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने 2020-21 या वित्तीय वर्षात 14 राज्यांसाठी एकूण  74,340 कोटी रुपयांच्या पोस्ट डिव्होल्युशन रेव्हिन्यू डेफिसिट अनुदानाची शिफारस केली. आयोगाने शिफारस केल्यापैकी 100 % रक्कम या 14 राज्यांना जारी करण्यात आली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी ही शिफारस केली आहे.

राज्यनिहाय जारी करण्यात आलेले पोस्ट डिव्होल्युशन रेव्हिन्यू डेफिसिट अनुदान

S.No.

Name of State

Amount released on 10th  March 2021

(12th instalment)

Total amount released in 2020-21

 

Andhra Pradesh

491.34

5896.92

 

Assam

631.48

7578.90

 

Himachal Pradesh

952.43

11430.85

 

Kerala

1276.72

15322.80

 

Manipur

235.30

2823.97

 

Meghalaya

40.91

490.99

 

Mizoram

118.48

1421.98

 

Nagaland

326.36

3916.94

 

Punjab

638.15

7658.90

 

Sikkim

37.33

448.00

 

Tamil Nadu

335.36

4024.94

 

Tripura

269.62

3235.95

 

Uttarakhand

422.93

5075.93

 

West Bengal

417.68

5012.93

 

Total

6194.09

74340.00

  

****

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703891) Visitor Counter : 173