रेल्वे मंत्रालय

हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर

Posted On: 10 MAR 2021 6:57PM by PIB Mumbai

 

रेल्वेने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ला खालील  सात नवीन हाय स्पीड रेल्वे (एचएसआर) कॉरिडोरसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम दिले आहे:

(i) दिल्ली-नोएडा-आग्रा-कानपूर-लखनऊ-वाराणसी

(ii) दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद

(iii) मुंबई-नाशिक-नागपूर

(iv) मुंबई-पुणे-हैद्राबाद

(v) चेन्नई-बंगळूरू-मैसूर

(vi) दिल्ली-चंडीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर

(vii) वाराणसी-पटना-हावडा

वरील सात हाय स्पीड कॉरिडॉरपैकी एकाही कॉरिडॉरला अद्यापपर्यंत मंजूरी दिलेली नाही. कोणताही एचएसआर प्रकल्प मंजूर करण्याचा निर्णय हा तपशीलवार प्रकल्प अहवालाचे परिणाम, तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता, स्रोतांची उपलब्धता आणि वित्तपुरवठा पर्याय यावर अवलंबून असतो. तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे आणि कॉरिडॉरसाठीचे मार्ग अद्याप निश्चित झालेले नाही.

रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703923) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu