आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून आरोग्यासाठी प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 MAR 2021 7:17PM by PIB Mumbai

 

आरोग्यासाठी प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी ( पीएमएसएसएन) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वित्त कायदा 2007 च्या कलम 136- बी अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे.

पीएमएसएसएन ची वैशिष्ट्ये

1. सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी

2. आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा पीएमएसएसएन मध्ये जमा केला जाईल.

3. पीएमएसएसएन मधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनांसाठी उपयोग केला जाईल.

  • आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय)
  • आयुष्मान भारत- आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (एबी-एचडब्ल्यूसी)
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान
  • प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय)
  • आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि  आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद
  • शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच राष्ट्रीय आरोग्य धोरण (एनएचपी ) 2017 मध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टे

4. पीएमएसएसएनचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे.

5.कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च  सुरवातीला पीएमएसएसएनमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च  सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत  करण्यात येईल.

 

लाभ :

याचा महत्वाचा लाभ म्हणजे निर्धारित संसाधनाच्या उपलब्धतेतून सार्वत्रिक आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्धता. त्याच बरोबर वित्तीय वर्षाच्या अखेरीला रकमेचा क्षय होणार नाही याची सुनिश्चिती

 

पूर्वपीठीका :

विकासाची उत्तम फळे प्राप्त होण्यासाठी आरोग्य महत्वाचे आहे. आर्थिक दृष्टीकोनातून पाहिल्यास उत्तम आरोग्यामुळे उत्पादकतेत वाढ होते.अकाली मृत्यू, दीर्घकालीन विकलांगता आणि मुदतीआधीच सेवानिवृत्ती यामुळे होणारे नुकसान कमी होते. आरोग्य आणि पोषण यांचा थेट शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होऊन उत्पादकता आणि उत्पन्नावरही परिणाम होतो. लोकसंख्येच्या जीवन आकांक्षेत एका अतिरिक्त वर्षामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात  दर डोई 4 % वाढ होते.आरोग्यातल्या गुंतवणुकीमुळे लाखो रोजगार , प्रामुख्याने महिलांसाठी रोजगार निर्माण होतात.

2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्त मंत्र्यांनी आयुष्मान भारत योजनेची घोषणा करताना 3 % शिक्षण उपकराच्या जागी 4 % आरोग्य आणि शिक्षण उपकर आणण्याची घोषणा केली होती.

*****

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703933) Visitor Counter : 129