वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नव्या रचनेतील रस्त्यावरच्या व्यवसायाच्या हातगाड्यांची निर्मिती
Posted On:
13 MAR 2021 9:31AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अहमदाबादच्या राष्ट्रीय डिझाईन संस्थेच्या समन्वयाने कोविड-19 विषयक काळजी घेता येईल, अशी वेगळ्या रचनेतील, माफक दरातील हातगाडी तयार करण्याची स्पर्धा घेतली होती. अहमदाबादसह,आंध्र प्रदेश आसाम, हरियाणा आणि मध्यप्रदेशातील राष्ट्रीय डिझाईन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा 22 डिसेंबर 2020 ते 5 फेब्रुवारी 2021 या कालावधीत झाली.
अहमदाबादच्या संस्थेने नव्या कार्ट म्हणजेच हातगाड्या बनवण्यासाठी डिझाईन हैकेथोन ही स्पर्धा घेतली होती. यातून निवड झालेल्या हातगाडी रचनाकारांना रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसाठी व्यापक प्रमाणावर अशा हातगाड्या बनवण्याचे निर्देश देण्याचाही प्रस्ताव आहे.
एनआयडी ने घेतलेल्या या स्पर्धेची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
कार्यक्रमाची सविस्तर माहिती :
अहमदाबाद,आंध्रप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश
चमूंचा क्रमांक / सहभागी विद्यार्थ्यांची संख्या आणी शुल्क(असल्यास)
27 चमू सहभागी 19 प्रकार
- तीन विद्यार्थ्यांचे चमू) 7 चमू
(3 विद्यार्थ्यांचा चमू) 13 चमूंची नोंदणी आणि 6 (सर्वोत्कृष्ट तीन चमू निवडले जातील.)
अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी विभागानुसार विविध क्षेनीत निवड झालेले उद्योग.
द्वितीय क्रमांक
अंशू टोप्पो
तृतीय क्रमांक
तिसरे डिजाईन
ठेला ऑक्ता दे कार्ट
फळे/भाजीपाल्यासाठी हातगाडी
विजेते : मंडी
द्वितीय क्रमांक : चॅरीयेट
तृतीय क्रमांक : अपना कार्ट
किराणा/इतर किरकोळ मालासाठीची हातगाडी
द्वितीय क्रमांक
एनिवेअर स्टोअर टीम मुडू
सुरुची जैस्वाल, चतुर्थ वर्ष, TAD
तुषार सोनकर , चतुर्थ वर्ष, CD
जननी श्रीधरन, चतुर्थ वर्ष, ID
टीम जुगाड गाडी
ब्रतादीप साहू, तृतीय वर्ष, CD
तेजस पवार, तृतीय वर्ष, ID
शुभम सावंत, तृतीय वर्ष, ID
टीम ट्रायबझ
हिमांशू शर्मा , द्वितीय वर्ष, ID
इशिका अरोरा, द्वितीय वर्ष, CD
अश्विन माजली , द्वितीय वर्ष, ID
ठेला गाडी- रस्त्यावरच्या हातगाडी व्यावसायिकांसाठी आदर्श गाडी
कार्ट ब्यॉय – सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली फास्ट फूड हातगाडी
अतिरिक्त – कल्पक बहुपयोगी खाद्यपदार्थ हातगाडी डिझाईन
कार्टवॉक – आधुनिक रचनेचे कार्ट आणि कल्पक पद्धतीने माल ठेवण्याची व्यवस्था.
यातून ज्युरी पैनेल निवड करेल. .
बक्षीसाचे स्वरूप
विजयी
40,000/-रुपये
द्वितीय क्रमांक
25000/- रुपये
तृतीय क्रमांक
15,000/- रुपये
पहिल्या तीन चमूना 21,000 रोख रक्कम
15000/- प्रत्येक विजयी चमूला प्रत्येकी
जाहीर होणार
या स्पर्धेचा उद्देश कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्याच्याशी सुसंगत अशा नव्या आणि किफायतशीर हातगाड्यांच्या रचनेला प्रोत्साहन देणे हा आहे.
या हातगाडीमुळे कोविड नंतरच्या काळातही उत्तम व्यावसायिक संधी मिळणे अपेक्षित आहे. या डिझाईमध्ये हातगाडीवाल्यांना येणाऱ्या समस्यांचा विचार करून, त्यातूनही मार्ग शोधले जायला हवेत, जेणेकरून ते उत्तम कार्यक्षमतेने आणि स्वाभिमानाने आपला व्यवसाय करू शकतील. यात समाजातील सर्व स्तरातल्या लोकांच्या गरजा आणि अपेक्षांचा विचार व्हायला हवा.
हातगाडीवाले पारंपारिक पद्धतीच्या हातगाड्या आपल्या व्यवसायासाठी वापरत असत, मात्र कोविड-19 नंतरच्या काळात, या हातगाडीत आणखी काही वैशिष्ट्ये असण्याची गरज निर्माण झाली. ज्यात, मालाचे वेष्टन, त्याची मांडणी, बिलिंग, स्वच्छता, बंद होण्याची लवचिकता, आटोपशीरपणा, इकडे तिकडे नेण्याची व्यवस्था, कचरा संकलन व्यवस्था, बसण्याची जागा इत्यादीची गरज निर्माण झाली.कोविडमुळे भारतातील हातगाडीवाल्यांची अवस्था बिकट आहे. ग्राहक आणि मागणीचे नुकसान, फिरस्तीवर येणारे निर्बंध, स्वच्छतेचे मुद्दे आणि व्यावसायिक स्पर्धेतील आव्हाने इत्याडी समस्या निर्माण झाल्या. कोविड19 नंतरच्या काळात, आता हातगाडी व्यावसायिकांसाठीची परिस्थिती बदलली आहे. त्यांच्या व्यवसायाला कालानुरूप नवे स्वरूप देण्याच्या आणि ग्राहकांना आकर्षित करण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या काळात, या नव्य स्वरूपातील हातगाड्या व्यावसायिकांसाठी सर्वच दृष्टीने नवी सुरुवात, नवी संधी ठरू शकतील.
***
Jaydevi PS/Radhika/CY
****
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704554)
Visitor Counter : 275