युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारत आणि मालदीव दरम्यान क्रीडा आणि युवक कल्याण क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2021 5:40PM by PIB Mumbai
भारताचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि मालदीवच्या युवक, क्रीडा व समुदाय सशक्तीकरण मंत्रालय यांच्यात क्रीडा आणि युवक कल्याण क्षेत्रातील सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. नोव्हेंबर, 2020 मध्ये हा सामंजस्य करार झाला होता.
उद्देश-
भारत आणि मालदीव यांच्यात क्रीडा आणि युवक कल्याण विषयक द्विपक्षीय देवाणघेवाण कार्यक्रमांमुळे माहितीत भर पडेल तसेच क्रीडा विज्ञान, क्रीडा चिकित्सा, प्रशिक्षण तंत्र यात तज्ज्ञ तयार होतील आणि युवा महोत्सव व शिबिरामध्ये भाग घेण्यास मदत होईल ज्यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होईल आणि भारत व मालदीव दरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत होतील.
फायदे -
मालदीवबरोबर क्रीडा आणि युवक कल्याणातील द्विपक्षीय सहकार्यामुळे होणारे फायदे सर्व क्रीडापटूंना सारखेच मिळतील मग ते कोणत्याही जात, पंथ, प्रांत, धर्म आणि लिंगाचे असोत.
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1705172)
आगंतुक पटल : 212