वस्त्रोद्योग मंत्रालय

भारतीय हस्तशिल्प आणि हातमाग निर्यात महामंडळ लिमिटेड  बंद करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAR 2021 5:43PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या भारतीय हस्तकला आणि हातमाग निर्यात महामंडळ (एचएचईसी) बंद करायला मंजुरी दिली आहे.

महामंडळात 59 स्थायी कर्मचारी आणि 6 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. सर्व स्थायी कर्मचारी व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींना सार्वजनिक उपक्रम विभागाने ठरवलेल्या निकषांनुसार ऐच्छिक सेवानिवृत्ती योजनेचा (व्हीआरएस) लाभ घेण्याची संधी दिली जाईल.

या मंजुरीमुळे सरकारचा क्रियाशील नसलेल्या आणि उत्पन्न मिळवत नसलेल्या आजारी उद्योगांमध्ये पगार / वेतनावर वारंवार होणारा खर्च कमी करण्यात मदत होईल.

आर्थिक वर्ष 2015-16 पासून महामंडळ सातत्याने तोट्यात  आहे आणि  खर्च भागवण्यासाठी पुरेसे उत्पन्न कमवत  नाही. त्याच्या पुनरुज्जीवनाची शक्यता फार  कमी असल्यामुळे  कंपनी बंद करणे आवश्यक आहे.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705176) Visitor Counter : 138