ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारतीय खाद्य महामंडळ गोदामांच्या स्थितीची पाहणी करते आणि त्यांची साठवण क्षमता योग्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी सुधारात्मक कारवाई करते

Posted On: 16 MAR 2021 5:58PM by PIB Mumbai

 

भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) नियमितपणे त्यांच्या गोदामाच्या स्थितीची पाहणी करते आणि गोदामांच्या साठवणुकीची योग्य क्षमता सुनिश्चित करण्यासाठी दुरुस्ती आणि नूतनीकरणासारख्या सुधारात्मक कारवाई करते. तथापि काही गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाची आवश्यकता आहे किंवा जी गोदामे बंद करण्याच्या स्थिती मध्ये आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

अनु.क्र.

प्रदेश

गोदामाचे नाव

क्षमता (एमटी)
 

1.

पंजाब

एफएसडी भागसर

8,836

2.

हरयाणा

एमआरएम करनाल

4,000

3.

 

फरीदाबाद

20,000

4.

आंध्रप्रदेश

एफएसडी पलकोले

10,000

5.

 

एमडी विजाग

5,000

6.

चेन्नई

एफएसडी आवडी (3 गोदामे)

9,900

7.

महाराष्ट्र

एफएसडी मनमाड

15,378

 

 

एफएसडी बोरीवली

12,594

 

एकूण

85,708

 

केंद्रीय वखार महामंडळाकडे (सीडब्ल्यूसी) कोणतेही जीर्ण/मोडकळीस आलेले गोदाम नाही. तथापि, सीडब्ल्यूसी गोदामांमध्ये 41300 मेट्रिक टन क्षमता योग्य नसलेल्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागणार आहे.

जीर्ण/मोडकळीस आलेली गोदामे, एंड-ऑफ-लाइफ गोदामे, सीएपी कॉम्प्लेक्स आणि एफसीआयच्या रिक्त जागेवर कोठार / पारंपारिक गोदामांची योजना आखली  आहे.तपशील खालीलप्रमाणे आहेतः

  1. 3.50 एलएमटी क्षमतेसह 8 ठिकाणी रेल्वे साईडिंग कोठार विचाराधीन आहेत.
  2. प्रस्तावित हब अँड स्पोक मॉडेल अंतर्गत  7 ठिकाणी 3.375 एलएमटी क्षमतेच्या कोठारांची निवड करण्यात आली आहे.

 

साठवण सुविधांचे उन्नत व आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारने पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) प्रणाली नुसार पोलाद कोठार बांधण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. विविध ठिकाणी 30.75 एलएमटी क्षमतेची कोठारे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 8.25 एलएमटी क्षमतेचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. पुढे, हब अँड स्पोक मॉडेल अंतर्गत पीपीपी प्रणालीनुसार  35.875 एलएमटी क्षमतेची कोठार प्रस्तावित आहे.

सध्याच्या पारंपारिक गोदामांचे आधुनिकीकरण सिमेंट काँक्रीट रोड, कलर कोटेड प्रोफाइल शीट छप्पर आणि इतर वार्षिक दुरुस्ती व देखभाल कामांचा समावेश करून अन्न साठवण गोदामांमध्ये केले जात आहे.

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री दानवे रावसाहेब दादाराव यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

M.Iyengar/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1705198) Visitor Counter : 31


Read this release in: English , Urdu , Bengali