कंपनी व्यवहार मंत्रालय

2018 ते 2020 दरम्यान 324 कंपन्यांनी दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केले

Posted On: 16 MAR 2021 6:04PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) दिलेल्या आकडेवारीनुसार सन  2018 मध्ये  149 , सन  2019 मध्ये 103 आणि सन 2020  मध्ये 72 अशा एकूण 324 कंपन्यांनी या तीन वर्षांच्या कालावधीत दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार  राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

अधिक माहिती देताना ते  म्हणाले, एनसीएलटीने दिलेल्या आकडेवारीनुसार सन  2018 मध्ये  8,330 अर्ज, सन 2019  मध्ये 12,091 आणि सन  2020  मध्ये 5,282 अर्ज आयबीसी अंतर्गत दाखल करण्यात आले होते. म्हणूनच असे दिसून येते की गेल्या तीन वर्षांत अर्जांची संख्या वाढली नाही.

कंपनी कायदा  2013 नुसार कंपन्यांना आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून सहा महिन्यांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेणे आवश्यक असते. म्हणूनच, सीएसआर बद्दल खुलासा असलेले वित्तीय विवरण आणि मंडळाचा अहवाल एजीएम झाल्यापासून 30 दिवसांच्या आत एमसीए 21 डेटा बेसमध्ये दाखल करावयाचे आहेत. अशा प्रकारे, चालू आर्थिक वर्षात सीएसआर अनिवार्य कंपन्यांद्वारे अद्याप काहीही दाखल करण्यात आले नाही.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1705205) Visitor Counter : 28


Read this release in: Urdu , Bengali , English