ऊर्जा मंत्रालय

जेपी पॉवरग्रीड लिमिटेड मधल्या 74% भाग भांडवल अधिग्रहणासाठी पॉवरग्रीडने केल्या करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 22 MAR 2021 6:05PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालया अंतर्गत असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रीड) या महारत्न सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमाने, जेपी पॉवरग्रीड लिमिटेड जेव्ही (जेपीएल) मधल्या 74% भाग भांडवल अधिग्रहणासाठी जयप्रकाश पॉवर व्हेन्चर लिमिटेड ( जेपीव्हीएल) समवेत समभाग खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या नंतर जेपीएल ही पॉवरग्रीडच्या संपूर्णतः मालकीची उपकंपनी होणार आहे. सध्या जेपीएल मध्ये  पॉवरग्रीडचे 26%भाग भांडवल आहे.

जेपीएलने हिमाचल प्रदेशातल्या कार्चम-वांगटू  प्रकल्पातल्या विजेबाबत 214 किमी लांबीचा ईएचव्ही उर्जा पारेषण प्रकल्प विकसित केला आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना यातून वीज वापर आणि वितरण केले जाते.

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706683) Visitor Counter : 183