कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

नोकरी इच्छुकांची वयोमर्यादा वाढविण्यासंदर्भात स्पष्टीकरण

Posted On: 25 MAR 2021 4:23PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या पदांवरील भरती संदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या संस्था (UPSC) परीक्षा सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी  कोविड -19 महामारीच्या सुरक्षा  मार्गदर्शक तत्वांचे पालन करत  आवश्यक त्या उपाययोजना  करत आहे.नागरी सेवेच्या 2020 च्या पूर्वपरीक्षा दिनांक 04.10.2020 रोजी आयोजित करण्यात आली,त्यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवारांना नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्यायही दिला होता जेणेकरून जे  उमेदवार कोविड-19 महामारीच्या दरम्यान अन्य ठिकाणी गेले होते ,त्यांना देखील परीक्षेला बसता येऊ शकले असते . हे लक्षात घेता ,महामारीचा   काळ आणि टाळेबंदी या कारणास्तव  केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी   होणाऱ्या परीक्षांसाठी उमेदवारांची  वयोमर्यादा वाढविण्याचा प्रश्न उदभवत नाही.

याप्रमाणेच  राज्य सरकारांच्या विविध पदांसाठी  नोकरी इच्छुक तरुणांची अधिकतम वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याच्या संदर्भातील निर्णय हा संबंधित राज्य सरकारने घ्यायला हवा.

ही माहिती, पूर्वोत्तर राज्य विकास मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय तसेच अणुऊर्जा आणि अंतरीक्ष ,मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे दिली.

***

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1707535) Visitor Counter : 225