वस्त्रोद्योग मंत्रालय

पारंपरिक विणकाम कौशल्याचे पुनरुज्जीवन

Posted On: 25 MAR 2021 4:36PM by PIB Mumbai

 

कौशल्य उन्नत करणे  ही एक निरंतर प्रक्रिया आहे. तांत्रिक क्षेत्रातील हातमाग कामगारांसाठी गरज-आधारित कौशल्य अद्ययावतीकरण कार्यक्रम  उदा. ववस्त्रोद्योग क्षेत्रात समर्थ- क्षमता निर्मिती अंतर्गत विणकाम, रंगकामनक्षीकाम इ. आयोजित केले जाते.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनांअंतर्गत पात्र विणकरांना आरोग्य विमा प्रदान केला जातो.

केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय हातमाग विकास आणि देशभरातील विणकरांच्या कल्याणासाठी खालील योजना राबवत आहे:

  • राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (एनएचडीपी)
  • व्यापक हातमाग समूह विकास योजना  (सीएचसीडीएस)
  • हातमाग विणकरांची व्यापक कल्याणकारी योजना (एचडब्ल्यूसीडब्ल्यूएस)
  • सूत पुरवठा योजना (वायएसएस)

वरील योजनांच्या अंतर्गत, कच्चा माल, यंत्रमाग व इतर वस्तूची खरेदी, कल्पक रचना, वैविध्यपूर्ण उत्पादने, पायाभूत सुविधा विकास, कौशल्य सुधारणा, लाइटिंग युनिट्स, देश-विदेशातील बाजारपेठांमध्ये हातमाग उत्पादनांचे विपणन आणि सवलतीच्या दरात मुद्रा कर्ज यासाठी पात्र हातमाग एजन्सी / विणकर यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1707536) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu