आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने कोरोनाप्रतिबंधक लसींच्या सहा कोटींपेक्षा जास्त मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला


देशात 24 कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या

महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जास्त संख्येने दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद सुरुच

रुग्णसंख्येचा जास्त भार असलेल्या राज्यांनी/ केंद्रशासित प्रदेशांनी कठोर उपाययोजना करण्याचे केंद्राचे निर्देश

Posted On: 28 MAR 2021 11:24AM by PIB Mumbai

कोविड-19 विरुद्धच्या संघर्षामध्ये भारताने अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहे. देशाने लसीकरण मोहिमेत 6 कोटी मात्रा देण्याचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या अंतरिम अहवालानुसार 9,85,018 सत्रांमध्ये लसींच्या 6,02,69,782 मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये 81,52,808 आरोग्य कर्मचारी( पहिली मात्रा), 51,75,597 आरोग्य कर्मचारी( दुसरी मात्रा) आणि आघाडीवर काम करणारे 88,90,046 कर्मचारी( पहिली मात्रा) आणि आघाडीवर काम करणारे 36,52,749 कर्मचारी( दुसरी मात्रा) आणि विशिष्ट सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील 66,73,662 लाभार्थी( पहिली मात्रा) आणि 60 वर्षांवरील 2,77,24,920 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

 

आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रांमध्ये आठ राज्यांचा 60 टक्के वाटा आहे. या आठ राज्यांनी लाभार्थ्यांना प्रत्येकी 30 लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या आहेत.

लसीकरण मोहिमेच्या 71व्या दिवशी( 27 मार्च 2021) 21,54,170 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये 39,778 सत्रांमध्ये 20,09,805 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आणि 1,44,365 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या 1,44,365 कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या सात राज्यांमध्ये दैनंदिन नव्या कोविड रुग्णांच्या सर्वाधिक संख्येची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात नोंद झालेल्या एकूण 62,714 रुग्णांपैकी या राज्यांमध्ये 81.46 टक्के रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या नव्या रुग्णांमध्ये आठ राज्यांचा मिळून 84.74 टक्के वाटा आहे.

दैनंदिन रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त 35,726 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 3162 तर कर्नाटकमध्ये 2886 रुग्णांची नोंद झाली आहे.

 

 

देशभरात दैनंदिन रुग्णांमध्ये होणारी वाढ खालील नकाशात दर्शवली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी काल 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांशी( आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि महापालिका आयुक्तांशी आणि कोविड-19 मुळे सातत्याने वाढणाऱ्या रुग्णंसंख्येची झळ पोहोचलेल्या आणि चढा मृत्यूदर असलेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली आणि कोविड महामारीची ही लाट थोपवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच सूत्री धोरणाची शिफारस केली. महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांचा त्यात समावेश आहे.

यामध्ये आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे देशाचा कोविड संक्रमणाचा एकूण दर 5 टक्क्यांच्या खाली कायम राहिला असून भारताने 24 कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे.

 

पंधरा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा( 1,74,602) प्रति दशलक्ष चाचण्या कमी केल्या आहेत

 

दैनंदिन संक्रमणाच्या दरात किंचित वाढ होऊन तो दर 5 टक्क्यांच्या वर(5.04%) झाला आहे.

आठ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये साप्ताहिक संक्रमण दर 5.04 टक्क्यांच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्रात साप्ताहिक संक्रमण दर सर्वाधिक 22.78 टक्के आहे.

देशात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या आज 4,86,310 वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 4.06 टक्के आहे. गेल्या 24 तासात उपचार सुरु असलेल्या रुग्णसंख्येत 33,663 ने घट झाली आहे.

भारतामध्ये आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 1,13,23,762 वर पोहोचली आहे. आजारातून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 94.59 टक्के झाला आहे.

गेल्या 24 तासात 28,739 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वात जास्त 14,523 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात 312 मृत्यूंची नोंद झाली.

नव्याने झालेल्या या मृत्यूंमध्ये सहा राज्यांचे प्रमाण 82.69 टक्के आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 166 मृत्यू झाले आहेत, त्याखालोखाल पंजाबमध्ये 45 तर केरळमध्ये 14 मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासात एकाही कोविड-19 मृत्यूची नोंद झालेली नाही. यामध्ये राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, लक्षद्वीप, लडाख( केंद्रशासित प्रदेश), दादरा नगर हवेली, मणीपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

**

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1708197) Visitor Counter : 217