विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

निरीक्षणात्मक खगोलशास्त्रातील दीर्घकालीन वैज्ञानिक समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळा


5 एप्रिल ते 9 एप्रिल 2021 या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 31 MAR 2021 5:40PM by PIB Mumbai

 

देशातील विविध संस्थांचे वैज्ञानिक अ‍ॅस्ट्रोफिजिकल जेट्स आणि पर्यवेक्षण सुविधा: राष्ट्रीय दृष्टीकोनया राष्ट्रीय कार्यशाळेत निरीक्षणात्मक खगोलशास्त्रातील दीर्घकालीन वैज्ञानिक समस्यांविषयी चर्चा करतील.

5 एप्रिल ते 9 एप्रिल 2021 या कालावधीत आयोजित या कार्यशाळेमध्ये ताऱ्यांसह विशाल आकाशगंगेतील विविध श्रेणीतील घटकांवर विचार मांडण्यासाठी भारतभरातील 30 हून अधिक संस्थांमधील 200 वैज्ञानिक आणि तरूण संशोधक एकत्र येण्याची अपेक्षा आहे.

अ‍ॅस्ट्रोफिजिकल जेट्स मोठ्या प्रमाणावर आयनीकृत पदार्थांचे बहिर्वाह म्हणून ओळखले जातात आणि निरिक्षणात्मक दृष्टीने आकाशगंगेतील आणि आकाशगंगेबाहेरील निरनिराळ्या स्त्रोतांमध्ये उत्सर्जन वाढविणारा किरण म्हणून पाहिले जाते. या रहस्यमय स्त्रोतांमागील मूलभूत भौतिकशास्त्र सर्वात कमी समजल्या जाणार्‍या क्षेत्रांपैकी एक आहे आणि अशा मनोरंजक स्त्रोतांविषयीचे विद्यमान ज्ञान सुधारण्यासाठी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (डीएसटी)  स्वायत्त संस्था आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) द्वारा आयोजित या कार्यशाळेत अस्तित्त्वात असलेल्या आणि आगामी भारतीय निरीक्षणात्मक सुविधांचा उपयोग करून या दीर्घकालीन वैज्ञानिक समस्या सोडविण्यासाठी समाज कसा हातभार लावू शकतो यावर विचारमंथन होईल. संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे केले जाईल.

भारतात, खगोलशास्त्रज्ञांचा एक मोठा समूह ऍक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्ली (एजीएन), गॅमा -रे बर्स्ट (जीआरबी), सुपरनोव्हा, एक्स-रे बायनरी इत्यादी खगोलशास्त्रीय स्त्रोतांमध्ये कार्य करतो आणि बहु-तरंगलांबी निरिक्षण सुविधांच्या श्रेणींचा उपयोग करतो. तसेच, नजीकच्या भविष्यात,आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस आणि देशातील अन्य आघाडीच्या संस्थांसह, स्थानिक प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे आगामी दशकांमध्ये या विषयावरील सीमांच्या संबोधनासाठी मोठ्या निरीक्षणात्मक सुविधांसह नवीन पिढी विकसित करण्याची योजना आहे.

सर्व हितधारकांना एकत्र आणून या विषयावर सविस्तर चर्चा करणे आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि भारतीय समुदायाला बळकट करण्यासाठी प्रस्तावित मार्गाचा आढावा घेणे हे या प्रस्तावित राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्दीष्ट आहे. ही कार्यशाळा विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (1971- 2121) सुवर्ण महोत्सवी स्मृती वर्षाचा एक भाग म्हणून तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा उत्सव साजरा करण्याच्या पहिला राष्ट्रीय कार्यक्रम - 'आजादी का अमृत महोत्सव' चा भाग म्हणून आयोजित केली गेली आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स (आयआयए) बंगळुरू, भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) मुंबई, रामन रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) बंगळुरू, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स पुणे, साहा इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स कोलकाता, इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आययूसीए) पुणे, फिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) अहमदाबाद आणि इसरो हेडक्वार्टर, बंगळुरू यांच्या सहकार्याने आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस ने या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

आकृती: मायक्रो-क्वेशर्स, गॅमा-रे ब्रशेस आणि ब्लेझर्स नावाच्या दूरवरच्या आकाशगंगेसारख्या वस्तूंमधून उत्सर्जन समजून घेण्यासाठी फेलिक्स मीराबेल आणि लुइस रोड्रिग्ज या प्राध्यापकांनी 2002 मध्ये स्काय अँड टेलिस्कोप मधे कलात्मक दृष्टिकोन प्रकाशित केला. तळाशी असलेल्या पॅनेलमध्ये अस्तित्त्वात असलेल्या खगोलशास्त्रीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याचे महत्त्व व देशाची क्षमता दर्शविण्यासाठी MACE, ASTROSAT, 3.6.m DOT आणि GMRT (डावीकडून उजवीकडे) यासह विद्यमान भारतीय वेधशास्त्रीय मल्टीबँड सुविधा दर्शविल्या गेल्या आहेत.

अधिक माहितीसाठी कार्यशाळेचे सह-अध्यक्ष, डॉ. शशी भूषण पांडे, एआरआयईएस, (shashi@aries.res.in , 09557470888) यांच्याशी संपर्क साधता येईल.

संकेतस्थळ: https://www.aries.res.in/jets_facilities/

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708734) Visitor Counter : 184