आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दुर्मिळ आजारांसाठीच्या राष्ट्रीय धोरण 2021 संबंधी स्पष्टीकरण
Posted On:
06 APR 2021 2:45PM by PIB Mumbai
वृत्तपत्रात अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या वृत्तात असे म्हटले आहे की दुर्मिळ आजार असलेल्या रुग्णांना सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार मिळतील. या संदर्भात, हे स्पष्ट करण्यात येत आहे की नुकतेच अधिसूचित झालेल्या “दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण 2021” मध्ये राष्ट्रीय आरोग्य निधीच्या छत्र योजने अंतर्गत एकदाच उपचार आवश्यक असलेल्या दुर्मिळ आजारांवरील (दुर्मिळ आजार धोरणामध्ये गट १ अंतर्गत रोगांची सूची )उपचारांसाठी 20 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्याची तरतूद आहे. अशा प्रकारची आर्थिक मदत केवळ बीपीएल कुटुंबांच्या लाभार्थीपुरती मर्यादित नसून आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (पीएमजेवाय) पात्र लोकसंख्येच्या सुमारे 40% लोकांना हा लाभ देण्यात येईल. दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी हे आर्थिक सहाय्य आयुष्मान भारत पीएमजेवाय अंतर्गत नव्हे तर राष्ट्रीय आरोग्य निधी (आरएएन) च्या छत्र योजने अंतर्गत प्रस्तावित आहे.
त्याशिवाय दुर्मिळ आजारांच्या धोरणामध्ये क्राऊड फंडिंगची कल्पना करण्यात आली आहे ज्यामध्ये दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी मजबूत आयटी प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक सहाय्य करण्यासाठी कॉर्पोरेट्स आणि व्यक्तींना प्रोत्साहित केले जाईल. या संकलित निधीचा उपयोग सर्वप्रथम दुर्मिळ आजारांच्या तिन्ही श्रेणींच्या उपचारांसाठी उत्कृष्टता केंद्रे वापरतील आणि शिल्लक निधी संशोधनासाठी वापरला जाऊ शकेल.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709837)
Visitor Counter : 337