भूविज्ञान मंत्रालय
विदर्भ, राजस्थान आणि तमिळनाडूच्या अंतर्गत भागात मंगळवारी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता
प्रविष्टि तिथि:
06 APR 2021 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 6 एप्रिल 2021
देशातील मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग, विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, ओदिशा, छत्तीसगड, सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग येथे काही ठिकाणी 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील ब्रह्मपुरी येथे काल देशातील सर्वात जास्त म्हणजे 43.5 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.
येत्या 24 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
या काळात राजस्थान, विदर्भ आणि तामिळनाडूच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1709841)
आगंतुक पटल : 303