संरक्षण मंत्रालय
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजला भेट दिली
Posted On:
06 APR 2021 5:47PM by PIB Mumbai
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 5 ते 6 एप्रिल 2021 दरम्यान डीएसएससी, वेलिंग्टन (तामिळनाडू ) येथे भेट दिली. वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसएससी) येथे 76 व्या स्टाफ कोर्सला उपस्थित प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना लष्कर प्रमुखांनी “पश्चिम आणि उत्तर सीमेवरील घडामोडी आणि त्यांचा लष्कराच्या भविष्यातील कृती आराखड्यावर परिणाम "यावर व्याख्यान दिले.देश आपल्या सीमांवर नवनवीन आव्हानांचा सामना करत असून या सर्व घडामोडींबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डीएसएससी कमांडंट लेफ्टनंट जनरल एमजेएस कहलन यांनी तिन्ही सेवादलांमध्ये एकात्मिक लष्करी कारवायांबाबत व्यावसायिक सैन्य प्रशिक्षण संदर्भात सध्या सुरु असलेल्या प्रशिक्षण आणि नवीन उपक्रमांबाबत लष्करप्रमुखांना माहिती दिली. व्यावसायिक लष्करी शिक्षणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून डीएसएससीची भूमिका वाढवण्याच्या दिशेने पाऊल म्हणून प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि पायाभूत विकासामध्ये केल्या जात असलेल्या बदलांविषयी लष्करप्रमुखांना अवगत करण्यात आले. कोविड 19 महामारीचे निर्बंध असूनही उच्च दर्जाचे प्रशिक्षण कायम ठेवल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.
***
M.Iyengar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709887)
Visitor Counter : 228