ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्रीय वखार महामंडळांच्या गोदामांची 2023 पर्यंत साठवण क्षमता दुप्पट करावी आणि आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 10,000 कोटी रुपयांची उलाढाल साध्य करावी: पीयूष गोयल


केंद्रीय वखार महामंडळांच्या सर्व गोदामांचे सुरक्षा मूल्यांकन केले जाणे आवश्यक

पीयूष गोयल यांनी आज केंद्रीय वखार महामंडळाच्या  आधुनिकीकरण आणि मालमत्ता रोखीकरण   योजनांचा आढावा घेतला

Posted On: 06 APR 2021 7:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण व ग्राहक व्यवहार, रेल्वे व वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केंद्रीय वखार महामंडळाच्या आधुनिकीकरण आणि मालमत्ता रोखीकरण   योजनांचा आढावा घेतला.

आढावा घेताना गोयल म्हणाले की केंद्रीय वखार महामंडळाने वर्ष 2023 पर्यंत साठवण क्षमता दुप्पट करावी आणि आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 10,000 कोटी रुपयांची उलाढाल साध्य करावी.  सध्या केंद्रीय वखार महामंडळाची गोदाम साठवण क्षमता 125 लाख मेट्रिक टन आहे.

आढावा बैठकीत  गोयल म्हणाले की शुल्क  तर्कसंगत करणे आणि गोदामांची स्थापना कोणत्याही नोकरशाही हस्तक्षेपाशिवाय केंद्रीय वखार महामंडळाने  स्वतंत्रपणे करावी. ते म्हणाले की कामांसाठी  निर्णय घेण्याचे जास्तीत जास्त अधिकार सीडब्ल्यूसीला देण्यात यावेत. त्यांनी केंद्रीय वखार महामंडळाला प्राधान्याने  देशात शीतगृह उभारण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच सीडब्ल्यूसीला सर्व गोदामांमध्ये नियमितपणे आग, भूकंप आणि अपघात यांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले.

गोयल म्हणाले, सीडब्ल्यूसीने संपूर्ण देशात गहू आणि तांदळाच्या साठवणुकीसाठी आधुनिक कोठारे बांधायला हवीत  जेणेकरुन देशात दीर्घकाळ जास्तीत जास्त धान्य साठवता येईल.

गोयल म्हणाले की सीडब्ल्यूसीने नाफेडच्या समन्वयाने कांदा, बटाटा आणि टोमॅटो साठवणुकीसाठी आणखी शीतगृहे साखळी सुविधा निर्माण कराव्यात.

सीडब्ल्यूसीने आपल्या सर्व 423  गोदामांच्या उन्नतीकरणासाठी एक बृहत आराखडा तयार करावा . सीडब्ल्यूसीने कृषी उत्पादनांसाठी गोदामे  / साठवणूकीचे  विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार वास्तुरचनाकार आणि तज्ञांच्या मदतीने योजना तयार कराव्यात अशी सूचना गोयल यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सीईडब्ल्यूसीने सर्व हितधारक म्हणजेच कर्मचारी, ग्राहक, कामगार, ट्रक चालकांची काळजी घेण्यासाठी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे.

ते म्हणाले, सर्व सीडब्ल्यूसीच्या गोदामांमध्ये आधुनिक आणि सोयीच्या सुविधा जसे पुरुष, महिला कामगार, ग्राहक, वाहन चालक आणि दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहे , योग्य प्रतीक्षा कक्ष / विश्रांतीगृह, कामगार-शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छ वातावरणासह इतर मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1709910) Visitor Counter : 263