विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सुपर कॉम्पुटिंग क्षेत्रात भारताचा अग्रणी देश म्हणून उदय

Posted On: 06 APR 2021 7:18PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय सुपर कॉम्पुटिंग अभियान (NSM) सुरु करत भारत, उच्च शक्तीच्या संगणक क्षेत्रात एक अग्रणी देश म्हणून उदय पावतो आहे. विविध क्षेत्रे, जसे की शिक्षणक्षेत्र, संशोधन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र ,तेल उत्खनन,पूराची पूर्वसूचना आणि जिनोमिक्स तसेच औषध संशोधन सारख्या क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांना आवश्यक असलेले संगणकीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या मिशनच्या माध्यमातून प्रोत्साहन आणि सुविधा दिल्या जात आहेत.

आतापर्यंत चार आघाडीच्या संस्थांमध्ये संगणकीय पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून, इतर इतर 9 संस्थांमध्ये हे काम वेगाने होत आहेत. राष्ट्रीय सुपर कॉम्पुटिंग अभियानाचा दुसरा टप्पा सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असून, यामुळे देशाची संगणकीय शक्ती (सुपर कॉम्युटिंग पॉवर), 16 पेटाफ्लॉप्स (PF) पर्यंत वाढणार आहे. देशातील 14 आघाडीच्या संस्थांमध्ये सुपर कॉम्युटिंग पॉवर विषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी- सामंजस्य करार झाला असून, याचे उत्पादन आणि  असेम्ब्लींग (संरचना तयार करणे) भारतातच होणार आहे. या संस्थांमध्ये आयआयटी, एनआयटी, राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि आयआयएसइआर या संस्थांचा समावेश आहे.

राष्ट्रीय सुपर कॉम्पुटिंग अभियानाच्या पहिल्या टप्प्यात, ज्या पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले होते, त्या सर्व स्थापन करण्यात आल्या आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातल्या पायाभूत सुविधा देखील लवकरचा पूर्ण केल्या जातील. त्याचवेळी, या वर्षीच्या सुरुवातीला, तिसऱ्या टप्प्यालाही सुरुवात करण्यात आली आहे. या  टप्प्यात संगणकीय गती (कॉम्प्युटिंग स्पीड) 45 पेटाफ्लॉप्स पर्यंत नेली जाणार आहे. यात तीन 3 पीएफ च्या तीन प्रणाली आणि राष्ट्रीय सुविधा म्हणून एक 20 पीएफची प्रणाली असेल.

देशातील संशोधन क्षमता वाढवण्याच्या हेतूने तसेच देशाला सुपरकॉम्प्युटिंग ग्रिड आणि नॅशनल नॉलेज नेटवर्क शी जोडण्यासाठी राष्ट्रीय सुपर कॉम्पुटिंग अभियान सुरु करण्यात आले होते. NSM द्वारे शिक्षणक्षेत्र आणि संशोधन संस्थांना सुपरकॉम्प्युटिंग सुविधांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. याचा काही भाग आयात केला जात आहे, तर काही भाग भारतातच तयार केला जात आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या दोन विभागांच्या देखरेखीखाली हे अभियान राबवले जात असून, त्याची अंमलबजावणी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ  ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग (C-DAC) पुणे, आणि इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(IISc) बंगळूरू, या नामांकित संस्था करत आहेत.

भारतात विकसित करण्यात आलेला परम शिवाय हा पहिला सुपर कॉम्प्युटर आयआयटी (बनारस हिंदू विश्वविद्यालय) येथे लावण्यात आला आहे. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या परम शक्ती, परम ब्रह्मा, परम युक्ती, परम संगणक  हे अनुक्रमे आयआयटी खरगपूर, IISER, पुणे, JNCASR, बेंगळूरू आणि आयआयटी कानपूर येथे बसवण्यात आले आहेत.

आता सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाशी उच्च कार्यक्षमतेचे कॉम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या आयामांना जोडत, या क्षेत्रात जागतिक नेतृत्व देण्याचे भारताचे प्रयत्न सुरु आहेत. 200 AI PF- ही कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली C-DAC मध्ये विकसित करून तिथेच बसवण्यात आली आहे. ही प्रणाली, अत्युच्च प्रमाणात मोठ्या अशा कामांचा भार सहज उचलू शकते, कृत्रिम बुद्धीमत्तेशी सबंधित कॉम्प्युटिंग प्रणालीचा वेग कितीतरी पटीने वाढवू शकते. परम सिद्धी-एआय या भारताच्या उच्च क्षमतेच्या कॉम्प्युटिंग-कृत्रिम बुद्धीमत्ता (HPC-AI) सुपर कॉम्प्युटर प्रणालीने जगभरातल्या सर्वात शक्तीशाली 500 सुपर कॉम्प्युटिंग प्रणालींच्या 16 नोव्हेंबर 2020 योजी जाहीर झालेल्या क्रमवारीत भारताची प्रणाली 62 व्या क्रमांकावर आहे.

या अभियानाअंतर्गत, उच्च कार्यक्षमतेविषयी (HPC) ज्ञान असलेल्या 4,500 तंत्रज्ञाना प्रशिक्षण आणि सुविधा देऊननेक्स्ट जनरेशन सुपर कॉम्प्युटर तज्ञांची फळी तयार करण्यात आली आहे. HPC प्रशिक्षणाच्या कार्यकक्षा वाढवण्यासाठी, NSM ने या प्रशिक्षणासाठी, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास, आयआयटी गोवा आणि आयआयटी पलक्कड येथे आपली चार नोडल केंद्रे सुरु केली आहेत. या केंद्रांनी HPC आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत.

NSM च्याच प्रेरणेने, भारतातील संशोधन संस्थां, उद्योगांशी समन्वय साधत अधिकाधिक सुटे भाग भारतात बनवले जावे, यासाठी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेत वाढ करत आहेत. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात, भारतात, 30 टक्के मूल्यवर्धन करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात ते 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. भारताने आतापर्यंत देशी बनावटीचा सर्व्हर (रुद्र) विकसित केला असून, सर्व सरकारे आणि सार्वजनिक कंपन्यांच्या HPC गरजा तो पूर्ण करू शकतो.

अभियानाच्या या तीन टप्प्यांमुळे उच्च-कार्यक्षमतेच्या कॉम्प्युटिंग सुविधा, देशातील सुमारे 75 संस्था आणि हजारो संशोधक आणि नॅशनल नॉलेज नेटवर्कच्य माध्यमातून कार्यरत शिक्षणतज्ञ- जे सुपरकॉम्प्युटिंग प्रणालीचा आधारभूत घटक आहेत- त्यांना याचा मोठा उपयोग होणार आहे.

 

 

 

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709913) Visitor Counter : 350