उपराष्ट्रपती कार्यालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        उपराष्ट्रपतींनी आगामी 'उगादी, गुढी पाडवा, चैत्र सुकलादी, चेती चांद, बैसाखी, विशु, पुथांडू, वैशाखदी आणि बोहाग बिहू' या सणांनिमित्त  देशवासियांना दिल्या शुभेच्छा
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                12 APR 2021 4:02PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
उपराष्ट्रपती श्री . एम व्यंकय्या नायडू यांनी देशातील जनतेला , आगामी 'उगादी, गुढी पाडवा, चैत्र सुकलादी, चेतीचांद, बैसाखी, विशु, पुथांडू, वैशाखदी आणि बोहाग बिहू' या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी दिलेल्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे -
'उगादी, गुढी पाडवा, चैत्र सुकलादी, चेती चांद, बैसाखी, विशु, पुथांडू, वैशाखदी आणि बोहाग बिहू' या सणांच्या शुभप्रसंगी मी आपल्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो .
हे सण पारंपरिक नवीन वर्षाची सुरुवात करतात आणि आपल्या देशातील संमिश्र संस्कृती आणि समृद्ध वारसा प्रतिबिंबित करतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लोक या सणाला  'उगादी' म्हणून संबोधतात तर कर्नाटकात हा सण ' युगदी'  म्हणून साजरा केला जातो.  महाराष्ट्रात ' गुढीपाडवा ' आणि तामिळनाडूत 'पुथांडू' म्हणून हा सण साजरा करतात. तर आमच्या मल्याळी बंधू आणि भगिनी ' विशू' म्हणून हा सण केरळमध्ये साजरा करतात . या सणाला पंजाबमध्ये ' बैसाखी' आणि ओदिशात 'पाना संक्रांती'  म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये ‘पॉयला  बैशाख’ ने  नवीन वर्षाची सुरुवात करतात आणि आसाममध्ये 'बोहाग बिहू' या सणाने नवीन वर्षाची सुरुवात होते . नावे वेगवेगळी आहेत मात्र आनंद , आशा आणि एकरूपता यांनी भरलेले उत्सवाचे चैतन्य समान आहे.
आपले  धर्मग्रंथ आणि पुराणे हे निसर्गाबद्दल आपला आदर दर्शविणार्या घटनांनी परिपूर्ण आहेत. आपल्या देशातील पीक हंगाम हा  निसर्गाने दिलेले चैतन्य  आणि विपुलता साजरी  करण्याचे  एक निमित्त आहे. 
आपल्या देशात नेहमीच कुटुंब आणि मित्र मैत्रिणी एकत्र येऊन विविध सण साजरे  करतात मात्र कोविड 19  महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता ,कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य आणि स्वच्छतेच्या  शिष्टाचारांचे पालन करून सण साजरा करण्याचे आवाहन , मी माझ्या सहकारी नागरिकांना करतो.
हे सण आपल्या देशात शांतता, ऐक्य, समृद्धी आणि आनंद आणतील,अशी आशा व्यक्त करतो
***
Jaydevi PS/S.Chavan/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1711153)
                Visitor Counter : 331