संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाईदलाच्या कमांडर्सची 15 एप्रिलला परिषद

Posted On: 12 APR 2021 7:02PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाईदलाच्या कमांडर्सच्या 2021 या वर्षासाठीच्या पहिल्या द्विवार्षिक परिषदेचे उद्घाटन संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते 15 एप्रिल 2021 रोजी हवाईदल मुख्यालय म्हणजेच वायू भवन येथे होईल.

येत्या काळात भारतीय हवाई दलाच्या परिचालन क्षमतेसंबधीच्या बाबींचा आढावा घेण्यासाठी ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. भारतीय हवाईदलाच्या  क्षमता अधिक  बळकट करण्याच्या दृष्टीने रणनीती आणि  धोरणे आखण्याच्या उद्दिष्टाने या तीन दिवसीय सत्रात चर्चा  होईल.

हवाईदल कमांडर्सची ही द्विवार्षिक परिषद वायू भवन या वायूदलाच्या मुख्यालयाच्या सुबोर्तो ह़ॉल येथे होईल. या  परिषदेमुळे परिचालन, देखभाल आणि प्रशासन यासंबधी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरील चर्चेसाठी दलाच्या वरिष्ठ नेतृत्वाला व्यासपीठ उपलब्ध होईल. वायूदलाच्या सर्व कमांड्सचे हवाई अधिकारी कमांडिंग-इन-चीफ , सर्व मुख्य कर्मचारी अधिकारी हवाई मुख्यालयातील  सर्व महासंचालक या परिषदेला उपस्थित राहतील.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1711207) Visitor Counter : 173