आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील एकूण लसीकरण 11.44 कोटींहून अधिक


गेल्या 24 तासांत 33 लाख लसींच्या  मात्र दिल्या गेल्या

81% नव्या रूग्णांची नोंद 10 राज्यांत

भारतातील एकूण  सक्रीय रुग्णांपैकी  67.16% रूग्ण पाच राज्यांत

Posted On: 15 APR 2021 4:05PM by PIB Mumbai

 

देशभरात कोविड -19 च्या लसींचा एकूण 11.44 कोटी मात्रांचा टप्पा पार झाला आहे.  सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील लसीकरणाला चालना  देण्यासाठी, दिनांक 11 ते 14 एप्रिल 2021 या चार दिवसांच्या कालावधीत, देशभरात लसीकरण उत्सव(टीका उत्सव) साजरा करण्यात आला. या लसीकरण उत्सवाच्या  कालावधीत,एकूण लसीकरणाच्या आकडेवारीनुसार 1,28,98,314 पात्र  लोकसंख्येच्या समूहांना लसींच्या मात्रा  देऊन लसीकरणाने  मोठी झेप  घेतली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 16,98,138 सत्रांद्वारे  11,44,93,238  लसींच्या मात्रा   देण्यात आले.यापैकी 90,64,527 आरोग्य कर्मचाऱ्यांना(HCW) पहिली मात्रा,  56,04,197 आरोग्य कर्मचाऱ्यांना (HCW) दुसरी मात्रा, 1,02,13,563, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW) पहिली  मात्रा, 50,64,862 कर्मचाऱ्यांना (FLW) दुसरी मात्रा, वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या  4,34,71,031 लाभार्थ्यांना पहिली  मात्रा,तर 27,47,0192 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा, तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,74,30,078  लाभार्थ्यांना पहिली  मात्रा तर 8,97,961 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा,देण्यात आली .

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

90,64,527

56,04,197

1,02,13,563

50,64,862

3,74,30,078

8,97,961

4,34,71,031

27,47,019

11,44,93,238

देशभरात आतापर्यंत दिलेल्या मात्रांपैकी 59.76% मात्रा  आठ राज्यांत दिल्या  आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001GN9S.jpg

खालील आलेख आठ राज्यांतील लसीकरणाची विवक्षित आकडेवारी दाखवत आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002P7GO.jpg

गेल्या 24  तासांत लसींच्या  एकूण 33 लाख मात्रा  देण्यात आल्या .

काल दिनांक  14 एप्रिल 2021या लसीकरणाच्या 89 व्या दिवशी 33,13,848 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या . त्यात 44,864, सत्रांतून  28,77,473, लाभार्थ्यांना  पहिली मात्रा देण्यात आली तर 4,36,375 लाभार्थ्यांना  दुसरी मात्रा  देण्यात आली.

Date: 14th April,2021 (Day-89)

HCWs

FLWs

45 to <60 years

Over 60 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

15,841

23,125

77,321

54,089

17,79,634

79,626

10,04,677

2,79,535

28,77,473

4,36,375

भारतातील  दैनंदिन  नवीन रुग्णसंख्येत  सतत भर पडत आहे.गेल्या 24 तासांत 2,00,739 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांतील दररोजच्या बाधित  रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 80.76% रूग्ण या 10 राज्यांत आहेत.

महाराष्ट्राच्या   दैनंदिन बाधित रुग्णांतसर्वाधिक 58,952  नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 20,439 तर दिल्लीत 17,282, नव्या रूग्णांची नोंद झाली.

खालील आलेख सोळा राज्यांत  रुग्णसंख्येचा वाढत जाणारा कल  दर्शवित आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003F3BI.jpg

भारतातील सक्रीय रूग्णसंख्या आता 14,71,877 वर पोचली आहे.एकूण बाधित  रुग्णांपैकी 10.46% रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 1,06,173  सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांत भारतातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 67.16% सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रीय  रुग्णांपैकी 43.54% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहेत .

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0041S1X.jpg

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0055TW8.jpg

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006KUDC.jpg

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007DNRE.jpg

भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 1,24,29,564 इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 88.31%आहे.

गेल्या 24 तासांत 93,528 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 1,038 मृत्यूंची नोंद झाली.

म्रुत्यु झालेल्यांपैकी 82.27% मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक (278) म्रुत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 120 मृत्यूंची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008O51I.jpg

नऊ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत, गेल्या 24 तासांत कोविड-19मुळे एकाही म्रुत्यूची नोंद झाली नाही.यात दीव आणि दमण,दादरा आणि नगरहवेली, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मिझोराम,मणीपूर,लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image009XBH7.jpg

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712016) Visitor Counter : 265