पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
Posted On:
03 MAY 2021 3:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपीयन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
भारत आणि यूरोपियन महासंघाच्या देशांमधील कोविड -19 ची सद्यस्थिती तसेच कोविड 19 ची दुसरी लाट रोखण्यासाठी भारताचे सुरू असलेले प्रयत्न यावर दोन्ही नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. कोविड -19 च्या दुसर्या लाटेविरुद्ध भारताच्या लढ्यासाठी त्वरित मदत पुरवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी युरोपिअन महासंघ आणि त्याच्या सदस्य देशांची प्रशंसा केली.
त्यांनी नमूद केले की भारत-युरोपियन महासंघ यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला जुलै महिन्यातील शेवटच्या शिखर परिषदेपासून नवीन गती मिळाली आहे. आगामी भारत-युरोपियन महासंघाच्या नेत्यांची 8 मे 2021 रोजी होणारी आभासी बैठक बहुआयामी भारत-युरोपिअन महासंघाच्या संबंधांना नवीन गती देण्याची संधी असल्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.
भारत-युरोपियन महासंघाच्या नेत्यांची बैठक ईयू + 27 स्वरूपातली पहिली बैठक असेल आणि भारत-युरोपियन महासंघाची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही बाजूंची सामायिक महत्त्वाकांक्षा यातून प्रतिबिंबित होते.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715676)
Visitor Counter : 235
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam