ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

सध्याच्या रब्बी विपणन हंगामात गेल्या रब्बी विपणन हंगामाच्या तुलनेत सरकारी एजन्सीकडून सुमारे 70% अधिक गहू खरेदी


02.05.2021 पर्यंत मध्यवर्ती साठ्याकरिता सुमारे 292.52 लाख मेट्रिक टन गहू खरेदी

सध्याच्या रब्बी विपणन हंगामातल्या खरेदीमुळे सुमारे 28.80 लाख गहू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ

पंजाबमधल्या शेतकऱ्यांना गहू विक्रीची रक्कम कोणत्याही विलंबाशिवाय थेट त्यांच्या बँक खात्यात जमा; 17,495  कोटी रुपये पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरीत

2021-22 च्या रब्बी विपणन हंगामासाठी किमान आधारभूत मूल्यावर आधारित खरेदी व्यवहारांना वेग

‘वन नेशन, वन एमएसपी, वन डीबीटी’ अभियान होत आहे  साकार

Posted On: 03 MAY 2021 3:54PM by PIB Mumbai

 

2021-22 च्या सध्याच्या रब्बी विपणन हंगामात, केंद्र सरकारने, सध्याच्या मूल्य समर्थन योजनेनुसार किमान आधारभूत किमतीने रब्बी पिकांची शेतकऱ्यांकडून खरेदी जारी ठेवली आहे. सध्याच्या रब्बी विपणन हंगामातल्या खरेदीमुळे सुमारे 28.80  लाख गहू उत्पादक शेतकऱ्यांना आधीच लाभ झाला आहे.

2021-22 च्या सध्याच्या रब्बी विपणन हंगामात, पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 17,495  कोटी रुपये आधीच थेट हस्तांतरीत करण्यात आले आहेत. गव्हाच्या विक्रीची रक्कम पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रथमच थेट जमा होत आहे.

पंजाब, हरियाणा,उत्तर  प्रदेश, चंदीगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आणि इतर राज्यात गव्हाची खरेदी वेगाने सुरु असून 2 मे 2021 पर्यंत 292.52 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे.  गेल्या वर्षीच्या याच काळातल्या 171.53  लाख मेट्रिक टन खरेदीशी तुलना करता यात साधारणपणे 70% वाढ झाली आहे.

2 मे 2021 पर्यंत झालेल्या एकूण 292.52 लाख मेट्रिक टन गहू खरेदी मध्ये मोठे योगदान  पंजाब 114.76 लाख मेट्रिक टन  (39.23%),  हरियाणा  80.55 लाख मेट्रिक टन  (27.53%) आणि मध्य प्रदेश 73.76 लाख मेट्रिक टन  (25.21%) राहिले आहे.

30 एप्रिल  2021 पर्यंत केलेल्या खरेदीसाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 17,495 कोटी रुपये, हरियाणातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 9268.24 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पंजाब आणि हरियाणातल्या सर्व खरेदी एजन्सीनी, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन हस्तांतरण सुरु केल्याने सार्वजनिक खरेदीच्या इतिहासात यावर्षी नवा अध्याय लिहिला गेला आहे. कठोर मेहनतीने पिकवलेल्या पिकांच्या विक्रीचे पैसे, ‘वन नेशन, वन एमएसपी, वन डीबीटीअंतर्गत आणि कोणताही विलंब न होता, प्रथमच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मिळत असल्याने पंजाब आणि हरियाणातले शेतकरी आनंदित  झाले आहेत.

***

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715684) Visitor Counter : 186